दि.19/1/2025 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्रीशैल्य प्रकल्प डाऊरनगर परिसरात रायगड भारत स्काऊट व गाईड भव्य मेळाव्याचे उद्घाटन मा.श्रीम.पुनिता गुरव मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड व मा.श्री.नितीन भोईर उद्योगपती तथा समाजसेवक उरण मा श्री संतोषजी शेडगे उपशिक्षणाधिकारी अलिबाग मा.सौ. प्रियंका म्हात्रे मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उरण मा.सौ सोनाली राठोड मॅडम DGO पेण रायगड मा.श्री प्रशांत गायकवाड सर रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट,मा.श्रीम. सरिता डफळ मॅडम रायगड जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड, मा.श्री ज्ञानेश्वर कोठावदे सर माजी मुख्याध्यापक एन आय हायस्कूल उरण मा. प्रथमेश पाटील माजी आदर्श स्काऊट एन आय हायस्कूल उरण, सर्व स्काऊट गाईड संचालक मंडळ, उरण तालुका सर्व केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती,अन्य सदस्य,सर्व शिक्षक बंधू भगिनी व अन्य मान्यवर यांच्या शुभहस्ते करण्यातआले.
सदर मेळावा रायगड भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय व रायगड जिल्हा शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि.16/1/2025 ते 19/1/2025 चार दिवशीय निवासी मेळावा इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 10वी या दोन गटात घेण्यात आला.
16 /1/2025 रोजी कार्यालयीन ध्वजारोहण, आगमन, तंबूरचना,मार्गदर्शन,संचलन, रात्री शेकोटी कार्यक्रमात मुलांचे व सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम व दिवेबंद पहारा असा दिनक्रम होता.तर पुढील दिवसात रामधुन बीपी सिक्स,तंबू स्वच्छता,तंबूनिरीक्षण,ध्वजारोहण, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा,रात्री शेकोटी कार्यक्रम, द्रोणागिरी किल्ला हाईक,गावची जत्रा,उरण शहर शोभायात्रा,सर्वधर्मीय प्रार्थना,तर 18 जानेवारी 2025 रोजी कब बुलबुल साठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 537 विद्यार्थी व 63 शिक्षक असे एकूण 600 कब बुलबुल कब लीडर व क्लाफ लीडर सहभागी झाले होते.
विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा राबवून हा मेळावा संपन्न झाला. या 41 वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेळावा म्हणून रायगड जिल्हा भारत स्काऊट गाईड व कब-बुलबुल मेळावा वेगवेगळ्या दानशूर दात्यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या चार दिवसात अनेक मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थी शिक्षक व आयोजक, रायगड युनिटचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मा.श्री.संतोषजी शेडगे साहेब उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अलिबाग यांच्या संकल्पनेतून स्काऊट- गाईड व कब-बुलबुलच्या रायगड इतिहासात पहिल्यांदाच रायगड जिल्हा परिषद पी.एम.श्री.13 शाळा व अन्य 19शाळा सहभागी झाल्या होत्या. जवळजवळ 650 स्काऊट- गाईड व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक स्काऊटर- गाईडर व नियोजन समिती असे मिळून 800 लोक दररोज निवासी स्वरूपात रहात होते. या सर्व विद्यार्थ्यांचा सकाळचा चहा नाश्ता दुपारचा चहा सकाळ संध्याकाळची भोजन निवासाची सोय निवासाची व्यवस्था मुला मुलींना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तसेच प्रोत्साहन पर मार्गदर्शन करणारे उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व तन-मन-धनाने मदत करणारे मा श्री नितीनजी भोईर व त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावतीने करण्यात आले. तर सर्व लोकांना चार दिवस संपूर्ण पाण्याची सोय आदर्श स्काऊट एन.आय.उरण हायस्कूल श्री प्रथमेश पाटील यांच्यावतीने करण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मान. श्री उन्मेष वाघ साहेब चेअरमन जे. एन. पी. ए उरण यांनी संपूर्ण किट ची व्यवस्था करून दिली. माननीय श्री ज्ञानेश्वर कोठावदे सर यांनी चार दिवस आरोग्यसेवा पुरवली
विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना उत्तेजित करण्यासाठी तसेच शिस्त व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चित फलदायी ठरणारा असा होता.
या मेळाव्याला भेट देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद श्रीमती कल्पना काकडे मॅडम विस्ताधिकारी अलिबाग, मा.श्री.मोहिते साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पनवेल, मा.श्री.साबळे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अलिबाग, मा.श्री.सचिन पाटील मा.श्री कालंग सर, मा.श्री धुळे सर जिल्हा परिषद , मा.शेडगे मॅडम, विविध पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक वर्ग,पालक भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंबू सजावटीचे कौतुक करत होते. आज मेळाव्याचा शेवटचा दिवस विद्यार्थ्यांनी चार दिवस विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा गुण गौरव कार्यक्रमाला मा.श्री नितीनजी भोईर उद्योजक मा.श्री.महेशजी म्हात्रे माजी पं.स सदस्य तथा संचालक सदस्य एन.आय.उरण.मा.श्री. रवी दादा भोईर समाजसेवक मा.श्री.सुनील भोपळे साहेब उपशिक्षणाधिकारी अलिबाग मा.श्री शेडगे साहेब उपशिक्षणाधिकारी अलिबाग मा.श्री.अरूण सप्ताळे साहेब भारत स्काऊट गाईड महाराष्ट्र राज्यचिटणीस सपत्नीक मा.श्री.गोपाळ जाधव केंद्रप्रमुख व अन्य पदाधिकारी, अधिकारी, मेळावा नियोजन सर्व समिती प्रमुख व सर्व सदस्य जिल्ह्यातून आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व स्काऊट गाईडस् उपस्थित होते.विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त स्काऊट गाईड व शाळांचा गुणगौरव करण्यात आला. तर लहान गट व मोठा गट यामध्ये सर्वाधिक बक्षीसे प्राप्त करणाऱी शाळा म्हणून डेविड इंग्लिश मिडीयम स्कूल चोंढी अलिबाग या शाळेला दोन्ही गटात या वर्षाचा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळाला. या शाळेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. जिल्ह्यातून एक बेस्ट स्काऊट- स्काऊटर व बेस्ट गाईड- गाईडर पुरस्कार देखील मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण गटशिक्षणाधिकारी सौ.प्रियंका म्हात्रे मॅडम अहोरात्र मेहनत घेणारे मा.श्री सोमीनाथ खरमाटे सर एनआय स्कूल सर्व संचालक मंडळ, जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय पेण अधिकारी वर्ग,उरण तालुक्यातील माननीय पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे उरण,सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख,निर्मला घरत, श्री गोपाळ जाधव, श्री शंकर म्हात्रे, श्री बबन पाटील, श्री अविनाश नवाळे, सर्व नियोजन समितीचे प्रमुख श्री श्रीकांत माने सर ,श्री उमेश म्हात्रे ,श्री बळीराम पाटील, श्री काशिनाथ म्हात्रे, श्री. भूषण झोपे, श्री हि.सो.म्हात्रे सर श्री प्रवीण पाटील,सौ मोहिनी पाटील,सौ.समता ठाकूर, श्री.निर्भय म्हात्रे, श्री.दीपक पाटील,श्री. कौशिक ठाकूर, सौ प्रतिभा लहासे, सौ मीनल माळी, श्री.रुपेश पाटील, श्री .उपेंद्र ठाकुर,श्री. विकास पाटील,श्री. रमनिक म्हात्रे, श्री.समाधान पाटील,श्री. कल्पेश ठाकूर,सौ सुचिता जोशी,सौ कविता म्हात्रे,अपर्णा पालकर सौ. अर्चना पाटील, सौ राजश्री मुंबईकर,सौ. प्रमिला गावंड,सौ. पूजा घरत सौ.पूनम पाटील,सौ.सुनीता येडगे ,सौ. चैताली म्हात्रे,सौ राजश्री पाटील व कब बुलबुल मेळाव्यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग,विषय साधन व्यक्ती श्री महाजन सर, श्री ठोंबरे सर,श्री वी. जी वाघमारे,श्री.एस. एस पाटील,वैशाली गावंड, सौ ज्योती ठाकूर सौ नीलम गावंड, सौ मनीषा पाटील सौ प्रतिभा तायडे सो सोनाली मॅडम उरण, श्री.संजय होळकर सर आदर्श शिक्षक पी.एम.श्री.शाळा मुळेखंड,(पी.एमश्री.शाळांचे नियोजन प्रमुख) सर्व समित्यांचे समिती प्रमुख शिक्षक बंधू भगिनी, उरण तालुका आरोग्य विभाग, श्रवण बिल्डिंग ए विंग, बी विंग, कीर्तन बिल्डिंग, सद्गुरू कृपा बंगला व जुईली मॅडम बंगला या इमारतीतील रूमचे मालक चार दिवस अखंड भोजन नास्ता, चहा देणारे व सर्व अन्न बनवणारे पुरुष महिला भगिनी यांच्या सहकार्यातून व मदतीने हा मेळावा यशस्वीरित्या दिमाखात पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन माननीय श्री.संतोष दाते सर यांनी केले.
.jpeg)


maha india
ReplyDelete