Type Here to Get Search Results !

वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न.



वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न.



पूजा चव्हाण -

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण  विभाग फुंडे ता.उरण,जि. रायगड येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीरा च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सुधीर घरत (जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा,महाविद्यालयीन विकास समिती सदस्य,फुंडे कामगार नेते यांनी आपल्या भाषणातून आजच्या तरुणाने देशाच्या विकासात हातभार लावणे गरजेचे आहे.भारत हा सध्या विकसनशील देश असला तरी भविष्यात विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येईल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून खऱ्या अर्थाने विद्यार्थी तयार होत असतो.श्रम प्रतिष्ठा, संस्कार,समाजभान,राजकारण अशा विविध गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत असते.




वेशवी गावचे नवनिर्वाचित सरपंच मा.श्री.अजित वसंत पाटील यांनी आपल्या मनोगतातून ग्रामविकास आणि आजचा तरुण यांचे नाते निर्माण व्हायला हवे असे मत व्यक्त केले.मा.श्री.विलास पाटील,माजी-सरपंच वेशवी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास याबरोबरच खेळ, समाजकारण या विषयात रस घेतला पाहिजे.याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना क्रिकेट व बॅडमिंटन सेट भेट म्हणून दिली.  मा.श्रीमती.रेश्मा ठाकूर ग्रामविकास अधिकारी वेशवी यांनीही शिबिरास मदत केली. प्रभारी प्राचार्य,डॉ.आमोद ठक्कर यांनी अध्यक्षीय मनोगतातून आजचा विद्यार्थी हा डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहे,असे मत व्यक्त केले.डिजिटल तंत्रज्ञान आणि अभ्यास यांची सांगड घालून गुणवत्तेचा विकास करावा असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राम गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले.डॉ.सी.डी.धिंदळे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments