उरण.माजी विद्यार्थी फुंडे कॉलेज टी वाय बी ए वर्ष 1998 -99 यांचे गेट टूगेदर.
रविवार दिनांक 9 फेब्रुवारी2025 रोजी ठिकाण धारू रिसॉर्ट रानसई धरणाच्या जवळ माझी विद्यार्थी फुंडे कॉलेज टी वाय बी ए वर्ष 1998 99 या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रणजीत माळी व श्री अलंकार म्हात्रे यांनी केले. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, कॉलेजे या कॉलेज मधून मिळालेल्या ज्ञाना च्या पिठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे.आज आपण जुने क्षण, जुन्या आठवणी नव्याने साजरी करण्यासाठी गेट together साठी ऐकत जमालेलो आहोत या कॉलेज ने आपल्याला असंख्य आठवणी आपल्या मनात कोरलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी सर्वाना एकत्र पाहून सर्वांचे चेहरे प्रसन्न वाटत होते.
श्री. जितेंद्र घरत, सौ दहिता व श्री दयानंद पाटील यांची अध्यक्षीय भाषणे झाली तसेच सर्व मित्रानी आपआपली मनोगते व्यक्त करून मने मोकळी केली. सर्वानुमते असे ठरले की आपण जसं कॉलेजचे शिक्षण घेतलं तसेच जर कोणी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्या विद्यार्थ्यांची जमेल तशी मदत करण्याचे सर्वांनी मते ठरविण्यात आले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला जमेल त्या परिस्थितीतून एखाद्या विशिष्ट प्रसंगात मदत करण्याचे ठरविण्यात आले.
तसेच ग्रुप मधल्या सर्व मित्र,मैत्रिणी नी एक मेकांना मदत करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले आज २५ वर्षा नंतर सर्व मित्र, मैत्रीणी पुन्हा एकदा एकत्र भेटले जुन्या आठवणी ताज्या झाल्या,प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
जमलेल्या सर्व मित्रांसाठी श्री जितेंद्र घरत (चिरले) त्यांच्याकडून जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
एका निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रिसॉर्ट मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील आठवणींना उजाळा देऊन एकमेकाची सुखदुःख जाणून घेतली.


.jpg)
Post a Comment
0 Comments