उरण शहरात दारू,जुगार,मटका ऑनलाईन रोटरी अशा विविध घाटंनांचा सुलसुळाट.
उरण पोलिस स्टेशन चा हाके चा अंतरावर असे अनेक धंदे चालु असल्याची तोंडी आणि लेखी तक्रार आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष संतोष भगत यांनी लोकल पोलिसांन कडे केली होती त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने संतोष भगत यांनी नाराजी वक्त केली आहे.
![]() |
साप्ताहिक उरण शहर सतत च्या बातमी ने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम करत आहे
जुगार अड्डे बंद व्हावे म्हणून
उरण पोलीस स्टेशन चा हाके चा अंतरावर बेकायदेशीर दारू, गांजा मटका, जुगाराचे अड्डे या सारखे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत स्थानिक गुंड ना जवळ करून हे धंदे चालु आहेत, सामाजिक संथा, राजकीय पक्ष (आम आदमी पार्टी ) यांनी लोकल पोलिसांना अनेक वेळा पत्र देऊन जुगार अड्डे बंद करण्या ची विनंती पोलिसांना केली पण पोलीस या गुंडा ना घाबरून किव्हा किस्से भरून गप्प आहेत असे जागृत नागरिक चर्चा करताना दिसतात.
उरण पोलिस स्टेशन पासून हाके चा अंतरावर हे सर्व दारू, गांजा,जुगार अड्डे, मटका, ऑनलाईन रोटरी यासारख्या अवैध धंदे सुरू आहेत काही जुगार अड्डे सिडको चा जागेत चालवले जातात.
या ठिकाणी उरण पोलीस स्टेशन पासून ५ मिनिटाच अंतरावर हे अवैध्य धंदे चालू आहेत पण पोलिस मात्र या कडे डोळे झाकून आहेत
हे अवैध व्यवसाय चालक, मालक पोलीस रेकॉर्डमध्ये गुन्हेगार आहेत का आणि या गुन्हेगारांचे व्यवसायिक पुनर्वसन पोलिसांनीच केलेले आहे का असा प्रश्न उरणकराना पडलेला आहे.
मा. पोलीस आयुक्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच अवैध धंद्यांवर निर्माण केलेली दहशत यावरच शंका उपस्थित होत आहे.आयुक्त अवैध धंदे चालत असलेल्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का? यावर जर कारवाई झाली नाही तर याबाबत जनजागृती करून जनआंदोलन उभे करणार अशी माहिती आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष भगत यांनी दिली.



.jpg)
Post a Comment
0 Comments