जेष्ठ नागरिक मंडळ भांडुप च्या वतीने गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा
मुंबई भांडुप दि. ३० गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील पवित्र सण असून गुढीपाडवा निमित्त हिंदू धर्मातील नागरिक गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरवात करतात. गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरवात होते. भांडुप मध्ये नवीन वर्षाची सुरवात सकाळी शोभायात्रेने झाली.
भांडुप मध्ये जेष्ठ नागरिक मंडळाचा वतीने भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली. चैत्र शुक्ल १, प्रतिपदा शके १९४६ हिंदू नव वर्ष दिन रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सकाळी
भांडुप पूर्व, पश्चिम
या मार्गावर शोभा यात्रा काढण्यात आली.
रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षण रांगोळ्या भगव्या पताका, सजावट, पारंपारिक वेशभूषेध हिंदू बंधू भगिनी सहभागी झाले.
या शोभयात्रेत सर्वच स्तरातील, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. ढोल ताशाने परिसर दुमदुमून गेल. शोभायात्रेत पारंपरिक भजन, लेझिम पथक व महिलांनी काढलेल्या बाईक रॅली मुळे शोभा यात्रेला शोभा आली.
विविध मैदानी खेळ व सहाशी खेळ दाखवून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.
भांडुप मधील सामाजिक संस्था, संघटना आदी संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य शोभायात्रेत मोठया संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते.


.jpg)

.jpg)


Post a Comment
0 Comments