उरण कोटगावातील एकजुटता कटिबद्ध राहण्यासाठी तसेच गाव हितासाठी *कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाने* एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी पालखीला
एक देव,एक गाव,एक एक साडी
एक देव, एक गाव,एक टी- शर्ट
कोट गाव ग्रामस्थ, हितचिंतक, गावातील क्रिकेट संघ,सांस्कृतिक मंडळ युवक मंडळ रिक्षा चालक-मालक व श्री. राघोबा देव पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना सुचित करण्यात येत आहे की, कोणीही कुठलाही प्रकारचे टी-शर्ट प्रिंट करण्यास देऊ नये आपल्या नवीन टी-शर्ट वर फक्त आपल्या देवाचे नाव गावाचे नाव व श्री. राघोबा देवाची प्रतिमा हेच प्रिंट करण्यात येईल. टी-शर्ट वर कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक अथवा सार्वजनिक नाव प्रिंट करण्यात येणार नाही.
अशी नवीन संकल्पना योजली आहे या योजने अंतर्गत *कोटगावं ग्रामस्थ सर्व महिला वर्ग ,सांस्कृतिक मंडळ, महिला मंडळ, महिला बचत गट व श्री राघोबा देव पालखी मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना* सूचित करण्यात येत आहे की,कुणीही कुठल्या प्रकारची इतर वैयक्तिक साडी पालखी उत्सवासाठी घेवू नये. व या नवीन संकल्पनेला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपल्या घरातील सर्व महिलांनी त्यांची नावे ही आपापल्या कुटुंबातील नेमलेल्या महिलेकडे द्यावी अशी आपणांस नम्र विनंती.
*टिप:-साडी साठी वर्गणी प्रत्येकी 350/रुपये. असेल तरी येत्या २० मार्च पर्यंत आपापले पैसे कुटुंबातील नेमून दिलेल्या महिलेकडे जमा करावेत.*
*टी-शर्ट साठी नावे देन्याची अंतिम तारीख ही ०५/०४/२०२५ राहिल यांची नोंद घ्यावी*
टी-शर्ट फी ही 250/- असेल. टी-शर्ट ची नावे प्रत्येक कुटुंबातील पंचाकडे द्यावी व कुटुंब वेतिरिक्त कोणाला पाहिजे असेल तर याना संपर्क करावा
विरेंद्र भोईर:- 9619382834
स्वराज भोईर:- 8879252183
तरी या नवीन संकल्पनेला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपल्या घरातील लहान मोठ्या सदस्यांची नावे द्यावी अशी आपणांस नम्र विनंती.
अध्यक्ष श्री. हेमंत परशुराम भोंबले
कोटगांव ग्रामसुधारना मंडळ



Post a Comment
0 Comments