Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकारी व सहकार्याना घडविली लंडन वारी!

 आंतरराष्ट्रीय कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकारी व सहकार्याना घडविली लंडन वारी!




उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )आय टी एफ लंडन या बहुराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड कमिटीची लंडन येथे ९ ते ११ एप्रिल रोजी बैठक सुरू असून एक्झिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत उपस्थित आहेत .






 लंडन येथे आय टी एफ चे मुख्य कार्यालय असून कार्यालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते त्याचबरोबर जागतिक पातळीवर कामगार हिताचे निर्णय याच बैठकीत पारित होत असतात . एक्झिक्युटिव बोर्ड मेंबर म्हणून असणारे महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार संघटनेचे पदाधिकारी व सहकार्यांना आयटीएफ लंडनचे मुख्यालय व तिथे चालणारे कामकाज हे पाहण्याकरता  स्वखर्चाने सर्वांना लंडन वारी घडविली.




Post a Comment

0 Comments