Type Here to Get Search Results !

शेवा कोळीवाडा ४० वर्षे पुनर्वसन फसवणूक, ठकवणूकीची सीआयडी /सीबीआय यंत्रणेने तपास करावा या मागणीसाठी शेवा कोळीवाडा विस्थापितांचे उपोषण

 शेवा कोळीवाडा ४० वर्षे पुनर्वसन फसवणूक, ठकवणूकीची सीआयडी /सीबीआय यंत्रणेने तपास करावा या मागणीसाठी शेवा कोळीवाडा विस्थापितांचे उपोषण 




उरण तहसील कार्यलयासमोर केले उपोषण 



त्वरित न्याय देण्याची केली मागणी.



तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित.


     उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )दि.१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. देशातील कोटयावधी दिन दुबल्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीने आज शेवा कोळीवाडा विस्थापित ४० वर्षे पुनर्वसन फसवणूक व  ठकवणूक आणि दिशाभूल केंद्र व राज्य सरकारचे लोक सेवक करत असल्याने त्याचा तपास सीआयडी / सीबीआय यंत्रणेने  करावा आणि दोषींना शिक्षा करावी या मागणी साठी आज तहसिलदार कार्यालय उरण येथे शेवा कोळीवाडा विस्थापितांनी आमरण उपोषण केले.




       मा.पोलीस उप निरीक्षक सागरी मोरा पोलीस ठाणे यांनी विस्थापितानी शासनाने पुनर्वसनासाठी दिलेल्या १७ हेक्टर जमिनी पैकी १५ हेक्टर जमीन वन विभागाला देणाऱ्या लोकसेवकावर केलेल्या लेखी तक्रारी बाबत दि.१३/०१/२०२५ रोजी मा. तहसिलदार उरण यांच्या कडे अहवाल मागीतला होता.त्या प्रमाणे मा. तहसिलदार उरण यांनी दि.१५/०१/२०२५ रोजी  मा. पोलीस उपनिरीक्षक,सागरी पोलीस ठाणे यांना दिलेल्या अहवालात  मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांचे मौजे बोरीपाखाडी, उरण येथे १७ हेक्टर जमिनीत शासनाचे माप दंडाणे पुनर्वसन मंजूर केले होते.मौजे बोरीपाखाडी उरण येथील १७ हेक्टर जमीन संपादन केली होती.त्या जमीनीवर मा.सहाय्यक  संचालक नगर रचनाकार अलिबाग यांनी शासनाचे माप दंडाणे दि.०८/०८/१९८५ रोजीचे नकाशात शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांची आखणी केलेली होती.जेएनपीटी (जेएनपीए )व्यवस्थापनाने १६ लक्ष ९० हजार फंड दिला होता.त्या रक्कमेत मा. जिल्हाधिकारी यांनी सन १९८६ साली १७ हेक्टर शेत जमिनी पैकी २ हेक्टर जमीन विकसित केली होती.उर्वरित शिल्लक राहीलेली १५ हेक्टर शेत जमिनीची समुद्राच्या भरती ओहोटीच्या क्रियेणे बांध बांदिस्ती तुटून त्या जमीनीत समुद्राचे पाणी आत येत असल्याने,प्रवाहा सोबत वाहून आलेल्या कांदळाच्या झाडाच्या बिया नैसर्गिक क्रियेने रुजून आज कांदळ वन झालेले आहे.म्हणून ती १५ हेक्टर जमीन दि.२८/०९/२०२२ रोजी  वन विभागाला दिली आहे. मा.जिल्हाधिकारी यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांचे मौजे बोरीपाखाडी, उरण  येथील १७ हेक्टर जमीनीत ४० वर्षात पुनर्वसन केलेले नाही. आणि बोगस ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा आहे.त्याचा हा सबळ पुरावा आहे. त्यामुळे शेवा कोळीवाडा विस्थापित नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी विस्थापित हनुमान कोळीवाडा तर्फे उरण तहसील कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधान कायद्याची आठवण करून देत होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ उपोषण करण्यात आले.यावेळी उरण तहसील कार्यालय समोर शेवा कोळीवाडा विस्थापित प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.


शेवा कोळीवाडा विस्थापित प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात व उपोषण संदर्भात मा.मुख्य व गृह मंत्री,मा.राज्यपाल ,मा.मुख्य न्यायमूर्ती उच न्यायालय ,मा. लोक आयुक्त ,मा. महसूल मंत्री वगैरे वगैरे यांना मा. तहसिलदार उरण यांचे द्वारा निवेदन देण्यात आले. तहसीलदार उद्धव कदम यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांनी उपोषण स्थगित केले.





Post a Comment

0 Comments