Type Here to Get Search Results !

उरण तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतूक कोंडी,सर्विस रोड-महामार्गावरील अनधिकृत पार्किंग बाबत बैठकीचे आयोजन

उरण तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतूक कोंडी,सर्विस रोड-महामार्गावरील अनधिकृत पार्किंग बाबत बैठकीचे आयोजन

वार्ताहर पुजा चव्हाण.

उरण तालुका अपघात निवारण समिती यांचा पुढाकारने



उरण तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतूक कोंडी,सर्विस रोड-महामार्गावरील अनधिकृत पार्किंग, पायाभूत सूविधा इ. बाबत दि 22 मे 2025 रोजी जेएनपीए काॅन्फरन्स हाॅल येथे बैठकिचे आयोजन केले होते. सदरहू बैठकिस जेएनपीएचे दोन्ही विश्वस्त - दिनेश पाटील आणि रवि पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, गोपाल पाटील, जेएनपीएचे मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) डाॅ थाॅमस, प्रशासकीय अधिकारी एस.के.कुलकर्णी आणि डीपी वर्ल्ड, जीटीआय, पीएसए (सिंगापूर), एनएसएफटी(जेएम बक्षी) या पोर्टचे अधिकारी, तिन्ही वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.




 जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी  सुरूवातीलाच जेएनपीए आणि इतर बंदर प्रशासनाकडून विविध स्तरावर होत असलेला निष्काळजीपणा आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याबद्दल खंत व्यक्त केली व यापुढे बैठकित घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकित प्रामुख्याने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

1.ट्रेलर कंटेनर रस्त्यात बंद पडले किंवा अपघात झाल्यास सदरहू वाहने उचलण्यासाठी जेएनपीएने दोन हैड्रा/टोइंग वाहने तातडीने उपलब्ध करावीत.

2.चारही बंदरातील ट्रफिक विभागाने बाहेर पडणार्या आपापल्या ट्रेलर- कंटेनरवर नियंत्रण ठेवावे, त्यासाठी फिरत्या वाहनांचा वापर करावा.

3.उरण तालुक्यातील रस्त्यांवर सीसी टिव्ही कॅमेरे बसवून वाहतूक/अपघात नियंत्रणासाठी कंट्रोल रूम सिस्टम तयार करावी.

4.ट्रेलर-कंटेनर आणि जड वाहनांनी फक्त  डाव्या बाजूच्या दोन लेनचा वापर करावा व वाहन महामार्गावर पार्किंग करू नये अशा वाहन चालकांना सूचना देण्याची व्यवस्था करावी.

5.जेएनपीए तर्फे दोन अँब्यूलन्स  तातडीने  देण्यात याव्यात.

वरील बाबत जेएनपीएचे दोन्ही विश्वस्त वेळोवेळी पाठपुरावा करणार आहेत. तसेच पुढील विभागीय बैठक उरण आणि कोप्रोली येथे लवकरच घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments