सा. उरण शहर
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८ व्या जयंती निमित्त चिंचपाडा पेण येथे आज विविध कार्यक्रम*
रायगड -
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती आज बुधवार दि. १४ मे २०२५ रोजी पेण शहरातील शांतिनिकेतन सोसायटी जवळील चिंचपाडा पेण येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या येथे संपन्न होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन, आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना संभाजी प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन
छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था -
पुजा चव्हाण अध्यक्ष रायगड जिल्हा प्रसिद्धी
व
छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा
आयोजकानी केला आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रम रुपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी १.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन व पूजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन व पूजन, संभाजी महाराज चौकाचे पूजन.
सायंकाळी ५. ०० वाजता भव्य मिरवणूक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व ते प्रज्वलन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सम्मान व गौरव सोहळा

Post a Comment
0 Comments