जसखार ग्रामपंचायत उपसरपंच पदी हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात प्रसिद्ध व श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत जसखार उपसरपंच जागा रिक्त झाल्यामुळे सोमवार दि.०९/०६/२०२५
रोजी झालेल्या मिटिंग मध्ये शिवसेना भाजप युतीच्या हेमलता ठाकूर या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
या विजयामध्ये उरण विधानसभेचे आमदार महेशशेठ बालदी यांचे तसेच शिवसेना(शिंदे गट)रायगड जिल्हाप्रमुख अतुलशेठ भगत यांचे विशेष सहकार्य लाभले .
युवा सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा जसखार यांच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ग्रामस्थानी सरपंच हेमलता ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment
0 Comments