आम्हाला लाज कधी वाटणार ?
रत्नागिरी पासुन पेण, अलिबाग, मुंबई, विरार, पालघर पर्यंत मोठ्या संख्येने असलेला आपला आगरी समाज.
उरण तालुक्यात लाखोंची संख्या असूनही मूठभरांची उपस्थिती .......
आगरी समाजनेते,समाजातील एक उच्च शिक्षित,मुंबई महानगरपालिकेचे १५ वर्षे नगरसेवक असलेले कॉ. जी. एल. पाटील यांचा स्मृतीदिन मंगळवारी होता. या कार्यक्रमात अवघे आठ ते दहा जण उपस्थित होते. याची आपल्याला कधी लाज वाटणार आहे की नाही ? असा प्रश्न आता पडल्याशिवाय राहत नाही. उरण तालुक्यातील २ ते अडीच लाख लोकसंख्या आहे. यात जवळपास दीड लाखांची आगरी समाजाची संख्या आहे. ८० टक्के पेक्षा अधिक हा समाज असतांनाही या समाजाला संघटीत करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्यास्वातंत्र्यपूर्व काळात एक लढाऊ समाज म्हणूनही मान्यता होती. तशी नोंद ब्रिटिशांनी केली आहे. मात्र हा समाज एकसंघ नव्हता. या समाजाला एकजूट करण्याचे काम कॉ. जी. एल. पाटील यांना अभिवादन करण्यासाठीही वेळ नसावा ही समाजाची शोकांतिका म्हणून दुर्लक्ष करणार की या समाजाच्या समोर उभ्या राहिलेल्या अस्तीत्व आणि अस्मितेला तिलांजली देणार असाही प्रश्न आता पडला आहे. उरणसह पनवेल पेण आणि अलिबाग मध्ये ८० ते ९० टक्के समाज आहे. उरणच्या वाढते औद्योगिक आणि नागरीकरणामुळे आपला स्थानिक भूमिपुत्र आणि खास करून आगरी समाज अल्प संख्याक बनला आहे.
आज अनेक गावात गावकरी ४० टक्के तर बाहेरील ६० टक्के से व्यस्त प्रमाण वाढू लागले आहे. आपल्या गावाची सत्ता भाडेकरू कडे जाण्याची अनेकजण खाजगीत चर्चा करतात. ही स्थिती गंभीर होणार आहे(बाहेरील लोकांना माझा विरोध नाही. कारण हा देश सर्वांचा आहे. ही भूमिका मानतो) मात्र असे असले तरी स्थानिक भूमिपुत्रांचा प्रथम हक्क हा मिळालाच पाहिजे. परंतु आम्ही दिवसेंदिवस संकुचित होऊ लागलो आहोत. गोविंदा किंवा गोपाळ काळा यात अनेकदा मी अमुक कर तमुककर आशा राजकीय नेत्यांच्या पैशांनी छापलेल्या टी शर्ट मिळविणारे तरुण पाहायला मिळतात. हे संकुचितपणाचे उदाहरण आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील संपूर्ण जमीनी या सरकारने विविध उद्योग,रस्ते,गोदाम,नागरी वसाहती उभारणीसाठी संपादीत, विक्री केल्याने स्थानिक भूमिपुत्र भूमीहीन झाले आहेत. आणि लवकरच होणार आहेत. ५५ वर्षांपासून उरणच्या पश्चिम विभाग आपल्या जमीनी गमावल्याने देशोधडीला लागले आहेत. (काहींनी कोट्यवधीची माया जमविली असली तरी सर्वसामान्य सर्वस्व गमावून बसले आहेत. जमीनी गेल्यानंतर काही मूठभराना चांगल्या नोकऱ्या लागल्या मात्र या उद्योगातील स्थानिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. येत्या दोन वर्षात जेएनपीटी,ओएनजीसी, वायू विद्युत केंद्र(गॅस टरबाईन)बीपीसील मध्ये एकही स्थानिक कामगार म्हणून शिल्लक राहणार नाही. तर सद्या रायगड सुरक्षा रक्षक मंडळात काम करणाऱ्या स्थानिक भूमीपुत्र सुरक्षा रक्षकांना ही कामावरून कमी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना वाचमनची नोकरी तरी मिळेल का हा सवाल उपस्थित झाला आहे. (राहिलाच तर तो कंत्राटी असेल)आगरी हे मुंबईचे आद्य रहिवाशी होते. मुंबईतील मंदीर गिरण्यांच्या जमिनीचे मालक हे आगरी होते. तर आज काळाचौकी येथील आगरी पाडा नाव असलेल्या ठिकाणी एकही आगरी औषधालाही शिल्लक नाही. तर जे मूळचे आगरी आहेत ते सायन कोळीवाडा येथील एका चाळीत वास्तव्य करतात. ही स्थिती मूळ स्थानिक भूमिपुत्रांची झाली आहे. हे धोके वेळीच लक्षात घेऊन स्थानिक भूमिपुत्र टिकला पाहिजे, शिकला पाहिजे,वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे ही भावना ठेवून समाजातील ज्या धुरिणिनी आपल्या समाजाला संघटीत करण्यासाठी परिश्रम घेतले त्यांना अभिवादन करण्याची तसदी घेऊ या एक होऊ या !
जगदीश तांडेल
रायगड भूषण ,पत्रकार

.jpg)
.jpg)

.jpg)
Post a Comment
0 Comments