पी.एम.श्री शाळा मुळेखंड शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एक दिवस आई-बाबांसाठी पाद्यपूजन सोहळा संपन्न
वार्ताहर पूजा चव्हाण
आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी पी.एम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळेखंड शाळेमध्ये अनादी काळापासून सुरू असलेली गुरु शिष्य परंपरा जपण्याचा तसेच गुरुना वंदन करण्याचा आजचा दिवस...
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
या उक्तीप्रमाणे आज शाळेत गुरू शिष्य परंपरे बरोबरच आपला सर्वांचा पहिला गुरु म्हणजे आपले आई-वडील. या आई-वडिलांचे पाद्यपूजन चरण सेवा सोहळा शाळेत साजरा करण्यात आला.
यामध्ये शाळेतील बऱ्याच पालकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे चरण पूजन करून आरतीने ओवाळणी करून त्यांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे tide कंपनी उरण तालुका समन्वयक यांचे ही पूजन करण्यात आले. आलेल्या प्रत्येक पालकांना तुळशीचे रोप देऊन पर्यावरण पूरक भेट मुलांकडून देण्यात आली. या सोहळ्यात अनेक पालक भाऊक झाले होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जीवन कौशल्यांबरोबरच संस्कार जीवनाचे शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे असे मत बऱ्याच पालकांनी व्यक्त केले. नंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे औक्षण करून चरण दर्शन घेतले. व स्वतः तयार करण्यात आलेले भेट वस्तू देण्यात आल्या.
तदनंतर टाईड कंपनीच्या वतीने पर्यावरणावर आधारित मी होणार पर्यावरण योद्धा या विषयावर ppt माध्यमातून चर्चा, प्रश्न, खेळ,गाणी यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरण विषय जनजागृती केली.त्यामध्ये श्री खरात सर व श्रीमती रंजीता मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी आनंदाने त्यांच्या या चर्चेत सहभाग घेतला.अशा प्रकारे गुरुपौर्णिमा दिवस उत्तम प्रकारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ.मनीषा म्हात्रे मॅडम, सौ रवीना केवट, सौ अनिता सावळे,सदस्या SMC,आमच्या मार्गदर्शिका जयवंती ठाकूर आई, ओम साई महिला बचत गट अध्यक्षा अस्मिता दयानंद म्हात्रे ताई, मुख्याध्यापक श्री.अमृत ठाकूर सर, ज्येष्ठ मार्गदर्शिका सौ.विद्या वाणी मॅडम. सौ दिशा तांडेल मॅडम,सौ अर्चना पाटील मॅडम या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन उपक्रमशील शिक्षक श्री संजय होळकर सर यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






.jpg)

Post a Comment
0 Comments