*केळवणे येथे डॉ. निशिगंधा देविदास शिवकर यांच्या श्रीदत्त डेंटल क्लिनिक'चे उदघाटन*
केळवणे–पनवेल/७ जुलै /अजय शिवकर
केळवणे गावात प्रथमच सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी डॉक्टर डी सी. शिवकर यांची कन्या निशिगंधा शिवकर यांच्या श्रीदत्त डेंटल क्लिनिक चे उद्घाटन सोमवार ७ जुलै ला आगरी मंच पेण चे संस्थापक. अध्यक्ष कै. वाय.एन. म्हात्रे साहेब यांच्या पत्नी यशोदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
डॉ. निशिगंधा शिवकर यांनी दंतशल्यविशारद (बी.डी.एस.) ही पदवी "येरला मेडिकल कालेज - वायः एम.टी-मुंबई येथून संपादन केली असून तीन वर्षे मुंबई चर्चगेट येथील जी.डी.सी. डेंटल हॉस्पीटल (सेंट जॉर्जेस) या सरकारी डेंटल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पीटलमध्ये अनुभव घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा, आपल्या गावाला लाभ व्हावा, खेड्यातील लोकांना कमी दरात उत्तम सुविधा मिळावी म्हणून सर्व सुविधांनी युक्त असा दातांचा दवाखाना उघडण्याचे ठरविले.
वैद्यकशास्त्राचे उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर खेड्यात दवाखाना चालवण्यास फारसे उत्सुक नसतात मात्र सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वडिलांप्रमाणेच समाजकार्यासाठी डॉक्टर निशिगंधा यांनी ते धाडस केले, म्हणून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे , या डेंटल क्लिनिकमध्ये...
▪️डिजिटल एक्सरे
▪️रुट कॅनल ट्रीटमेंट
▪️दात काढणे
▪️मशीन व्दारे दात साफ करणे
▪️कृत्रिम दात बसवणे (कायमचे/तात्पुरते
▪️कवळी बसविणे
▪️कंपोझिट/कॉस्मेटिक फिलींग (दाताच्या रंगाची फिलींग)
▪️हिरड्यांच्या आजाराची ट्रिटमेंट
▪️लहान मुलांच्या दातांची ट्रिटमेंट-
▪️अक्कल दाढ काढणे.
▪️वेडे वाकडे दात सरळ करणे.
▪️इम्लांट
▪️ब्लिचींग
अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
सदर उद्घाटन सोहळ्यास सरपंच श्री.गुरुराज ठाकूर, ग्राम. सदस्य श्री.कुमार पाटील, श्री.हिराजी शंकर शिवकर , ह. भ.प.श्री सदाशिव जाना शिवकर,श्री वि.ना. कोळी गुरुजी, श्री.अनंत माळी, डॉ. श्री.योगेश म्हात्रे श्री.संजय पाटील,श्री.कृष्णा भगत सर,श्री अशोक पाटील,श्री गोलिपकर सर, आदी मान्यवर उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवून डॉ.निशिगंधा शिवकर यांना शुभेच्छा दिल्या.
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com


.jpg)
Post a Comment
0 Comments