श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे कडून मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप
वार्ताहर पुजा चव्हाण
श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे यांच्याकडून गुरुवार दिनांक ३१/०७/ २०२५ रोजी जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा - उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी श्री रामदास गवत्या गावंड सामाजिक संस्थे मार्फत २५0 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, व रायटिंग पॅड आधी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप गावंड व पदाधिकारी श्री. केशव गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. साईनाथ गावंड यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले.
बातम्या आणि जाहिराती साठी mail id
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर मुंबईकर यांनी शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वाटप हे श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेने केल्यामुळे त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.श्री. केशव गावंड संस्थेचे सेक्रेटरी यांनी श्री रामदास गवत्या गावंड कडा, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे ही संस्था गेली वीस वर्षापासून कोणकोणते कार्यक्रम राबवत आहे. व शैक्षणिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य देखील करत आहे याची माहिती आपल्या मार्गदर्शनामध्ये दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप गावंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षण घेत असताना चांगल्या परीने करावा. आमची संस्था हि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असते पुढे देखील अशीच घेत राहील. तसेच विद्यार्थ्यांना जर शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या दूर करू असे शब्द दिले.
या प्रसंगी श्री रामदास गवत्या गावंड सामाजिक संस्था आवरे संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप गावंड, श्री केशव गावंड तसेच सर्व पदाधिकारी ,माध्यमिक शाळेचे चेअरमन श्री.पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन श्री. चंद्रकांत कोळी,
माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री. सुधीर मुंबईकर, प्रभारी मुख्याध्यापक श्री. साईनाथ गावंड, सहाय्यक शिक्षक श्री. सुगिंद्र म्हात्रे,श्री. अनिल पाटील, श्री मनोज म्हात्रे, स्वप्निल नागमोती, रोहिणी घरत, सौ सुनीता पाटील , सौ. राणी कदम, सौ.सुप्रिया मुंबईकर , श्री. सत्यवान मर्चंडे, सौ रुपाली चौधरी, कोल्हे मॅडम, शिक्षक,
विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमा ची सजावट श्री.घनश्याम म्हात्रे,दिनेश पाटील व सौ ममता गवस, यांनी केली. सूत्रसंचालन श्री. अनिल पाटील यांनी केले आभार सहाय्यक शिक्षिक. श्री सत्यवान मर्चंडे यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.


.jpg)

Post a Comment
0 Comments