उरण इंदिरा गांधी रुग्णालय ते बोरी पा खाडी रस्ता दुरुस्त करावा:
वार्ताहर पूजा चव्हाण.
आज कित्येक दिवस उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे रस्त्याची दुरावस्था झालेली आपल्याला दिसत आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी
Uranshahar@gmail.com
mahaindia24@gmail.com
रुग्णालय म्हंटल की या ठिकाणी जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान बाळ रुग्णांच्या गाड्या ॲम्बुलन्स यांची फार वर्दळ आसताना आपल्याला पहावयास मिळते.
तर या रस्त्यालाच लागून थोड्याच अंतरावर दोन मोठी नामांकित विद्यालय आहेत. या विद्यालयात नेहमी हजारो विद्यार्थी येत असतात. या सर्वाना या रस्त्यावर चलताना खुप त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुरावस्था मुळे येथे कित्येक वेळा अपघात देखील झालेले आहेत.तसेच या रस्त्याच्या किनारीला लागून मोठा नाला आहे. या नाल्याला कोणत्याही प्रकारचा कठाडा नसल्याने एखादे वाहन तोल गेल्यास नाल्यात जाण्याची शक्यता आहे त्या मुळे या नाल्याला कठाडा बघण्यात यावा.तसेच लहान मुळे ही देशाची भावी पिढी आहे देशाचे भवितव्य आहे या रस्त्याच्या दुरस्तेमुळे या लहान मुलांना जीव मुठीत घेऊन या रत्यावरून प्रवास करावा लागत आहे. तर या ठिकाणी भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.तसेच या पुढे या रस्त्यावर कोणतीही अपघात दुर्दैवी घटना घडल्यास याची सर्व जबाबदारी ही या संबंधित प्रशासनाची राहील. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे. अशी मागणी पत्रकार उत्कर्ष समितीच्या उरण तालुका अध्यक्षा पूजा चव्हाण यांनी एका लेखी निवेदनात केली आहे.


Post a Comment
0 Comments