उरण, पनवेल तालुक्यात झोपट्याने वाढत आहे तोतया पत्रकारांची संख्या
मुख्य संपादक आणि संपादकांचे बनावट आय कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आणि जाहिरात पत्रिका बनवून केली जात आहे बेकायदेशीर वसुली
प्रशासनाकडून कारवाईची तसेच बनावट पत्रकाराला कोणीही कोणत्याही प्रकारचे पाठबळ देऊ नये.
महा इंडिया न्युज, प्रतिनिधी, दि. १२ ऑक्टोबर.
वृत्तपत्र चालवण्यासाठी, सुरू करण्यासाठी, भारत सरकार च्या प्रेस रजिस्ट्रर चा कार्यालय येथे नोंदणी करणे अनिवार्य व बंधनकारक आहे. नोंदणीनंतर भारत सरकार रजिस्टर नंबर देते तो वृत्तपत्राच्या नोंदणीचा पुरावा असतो.
भारतात नोंदणीकृत माध्यमांबद्दल हे नियम आणि कायदे असूनही,
नवी मुंबई,उरण, पनवेल मध्ये बेकायदेशीर यूट्यूब चैनल मोठ्या प्रमाणात सुरु असुन त्यांच्या कडे press id त्यांचा बाईक, चारचाकी वर मोठया प्रमाणात PRESS लिहलेले पाट्या बघावंयास मिळत आहेत.
उरण, पनवेल, नवी मुंबई मध्ये बेकायदेशीर (फर्जी/तोतया) जे यूट्यूब चैनल किंवा पोर्टल चालवतात पण त्यांच्या कुठेही रजिस्टर नसलेला स्वतः संपादक तसेच त्यांच्याकडे असणाऱ्यांना Press Repoter चे fake id कार्ड दिले जाते. ह्या fake पत्रकारांची वाढती संख्या कायदेशीर वृत्तपत्रे साठी (जी नवी दिल्ली येथील प्रेस रजिस्ट्रर नोंदणीकृत आहेत) डोकेदुखी ठरत आहे. बहुतेक लोकांना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या नोंदणीची माहिती नसल्याचा फायदा घेऊन, त्यांना मूर्ख बनवून, जाहिराती आणि कार्यक्रमांची बनावट पत्रिका तयार करून, बनावट / तोतया पत्रकार जाहिरात आणि सहकार्याच्या नावाखाली उद्योगपती, जनता, नेते आणि सरकारी कार्यालयांची फसवणूक करताना दिसत आहे. साप्ताहिक उरण शहर व महाइंडिया न्युज पोर्टल, यूट्यूब चैनल ला पण ह्या तोतया पत्रकांरानमुळे जाहिराती मिळवणे कठीण जात आहे.
Fake रिपोर्टर ( तोतया पत्रकार )
भामटा पत्रकार किंवा तोतया, फर्जी पत्रकार हा शब्द बऱ्याचदा अशा व्यक्तींसाठी वापरला जातो जे पत्रकारितेच्या नावाखाली गैरव्यवहार करतात किंवा अनैतिक पद्धतीने काम करतात. हे लोक खऱ्या पत्रकारितेच्या तत्त्वांपासून दूर जाऊन स्वतःच्या स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करतात.
भामटा पत्रकारांची काही लक्षणे:
1. अनैतिक वर्तन: ते बातम्या विकतात किंवा दबाव आणण्यासाठी पत्रकारितेचा वापर करतात.
2. स्वार्थ: स्वतःचा फायदा किंवा आर्थिक लाभ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते.
3. खोटी माहिती: चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे.
4. प्रभाव आणणे: काही वेळा ते व्यक्ती किंवा संस्थांवर दबाव आणण्यासाठी पत्रकारितेचा गैरवापर करतात.
परिणाम:
- विश्वासार्हता कमी होते: खरी पत्रकारिता आणि पत्रकारांवर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो.
-माध्यमांची बदनामी: अशा वर्तनामुळे माध्यमांची प्रतिमा खराब होते.
- *समाजात गैरसमज*: चुकीची माहिती पसरल्याने समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात.
खरा पत्रकारिता:
- निष्पक्षता: खरे पत्रकार निष्पक्षपणे बातम्या देतात.
- सत्य शोधणे: सत्याचा शोध घेणे हे त्यांचे ध्येय असते.
- समाजसेवा: पत्रकारिता समाजाला जागरूक करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन असते.
अशा प्रकारचे गैरव्यवहार रोखण्यासाठी पत्रकारितेच्या नैतिक तत्त्वांचे पालन करणे आणि जबाबदार पत्रकारिता करणे गरजेचे आहे.
निमसरकारी कार्यालये आणि कायदेशीर आणि बेकायदेशीर व्यावसायिकांकडून अवैध वसूल करत आहेत. जर या बेकायदेशीर पत्रकारांवर वेळीच कारवाई केली नाही, तर तो दिवस दूर नाही जेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्यापासून त्रास होईल, अशा बनावट पत्रकारांवर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर बंदी घालणे आता सरकार आणि प्रशासनाला आवश्यक बनले आहे. सर्वप्रथम, प्रत्येक व्यक्तीने कोणतीही जाहिरात किंवा इतर कोणतेही सहकार्य करण्यापूर्वी सूचना आणि प्रसार मंत्रालयाने जारी केलेल्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे नोंदणी प्रमाणपत्र पडताळणी करावी. त्यानंतर कोणत्याही पत्रकार ता जाहिरात किंवा इतर सहयोग करावे, तरच समाजातून बेकायदेशीर पत्रकारिता रोखणे शक्य होईल. बेकायदेशीर पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत करू नये असे आवाहन उरणशहर व महाइंडिया न्युज चे संस्थापक सचिन तुकाराम काजरोळकर यांनी जनतेला केले असुन साप्ताहिक उरण शहर ला दिवाळी, नवीन वर्षाच्या जाहिराती मिळवून देण्या साठी प्रयत्न करावा अशी विनंती केली आहे 🙏🙏

.jpg)
.jpg)

Post a Comment
0 Comments