Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची फसवणूक आणि नावाने राजकारण – जनतेत तीव्र नाराजी !

 शेतकऱ्यांची फसवणूक आणि नावाने राजकारण – जनतेत तीव्र नाराजी !


दि.बा.पाटील यांच्या नावाने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न,पण न्याय अजून अधुराच…

( वार्ताहर पूजा चव्हाण यांसकडून)

नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ता.०८) बुधवारी संपन्न झाले. मात्र या सोहळ्यात स्थानिक शेतकऱ्यांचे प्रणेते, स्वर्गीय राष्ट्रीय नेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा उल्लेख न झाल्याने पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील जनतेत तीव्र नाराजी उसळली आहे.




ऑक्टोबर २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी जेएनपीटी (JNPT) मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनींची इरादापत्रे वाटली होती. त्या वेळी शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. 




२०१५ मधील उरण शहर ची बातमी 👆

परंतु आजपर्यंत ना नुकसानभरपाई मिळाली, ना जमीन परत, फक्त आश्वासनांचे ढिगारे आणि अपूर्ण वचने शेतकऱ्यांच्या ओझ्यात भर घालत आहेत.


त्यानंतर अटल सेतूच्या उद्घाटनावेळी पुन्हा एकदा मोदी यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊ, असे जाहीर केले होते. मात्र त्या शब्दांना आज कित्येक वर्षे लोटली असताना, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अजूनही तोच प्रश्न आहे “आमचं काय ?”


दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र, दिग्गज नेते दि.बा.पाटील यांची आठवण येते. त्यांनी सेवाभावाने काम केले. त्यांचे कार्य खूप प्रेरणादायी आहे आणि आपल्या सर्वांसाठी हेच प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाजसेवा करणाऱ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.”


तथापि, स्थानिक नागरिक व शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, भाषणात नाव घेतले असले तरी प्रत्यक्ष न्याय मात्र अद्याप अधुराच आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवणारे दि.बा.पाटील साहेब यांच्या नावानेच आता राजकीय सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका स्थानिक पातळीवर होत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी 

uranshahar@gmail.Com 

संपर्क करा




पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की “ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला, त्यांच्या विचारांना झाकून त्यांच्या नावावर राजकारण करणे ही जनतेची चक्क फसवणूक आहे. आज गरज आहे ती शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा बुलंद करण्याची आणि दि.बा.पाटील यांच्या संघर्षाची ज्योत पुन्हा पेटवण्याची.”


स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांनी शासनाकडून स्पष्ट भूमिका व न्याय्य भरपाईची मागणी केली आहे.

हा प्रश्न फक्त नुकसानभरपाईचा नाही तर सन्मान,अस्तित्व आणि सत्यासाठीच्या लढ्याचा आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.तसेच दि.बा.पाटील यांचे नाव देणार काय असे प्रश्न नागरिक करत आहेत.


Post a Comment

0 Comments