भावना घाणेकर यांच्या 'व्हिडिओ'चा इम्पॅक्ट! उरण नगरपरिषदेला लागली कचरा उचलण्याची 'घाई'
उरण / पूजा चव्हाण
उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांमार्फत उभ्या असलेल्या उमेदवार भावना घाणेकर यांच्या सोशल मीडियाने जबरदस्त प्रभाव दाखवला आहे. त्यांनी शहरातील साचलेल्या कचऱ्यावर पोस्ट केलेल्या व्हिडिओची तातडीने दखल घेत नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करण्या साठी...
Mail id- uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर.
सोशल मीडियाचा जोरदार दणका
सध्याच्या युगात विविध निवेदने आणि मागण्यांपेक्षा सोशल मीडियावरील एक व्हिडिओ किती प्रभावी ठरतो, याचा प्रत्यय उरणकरांना आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील साचलेल्या कचऱ्याचे, तसेच मोरा भागातील फायर स्टेशनचा वापर डंपिंग ग्राऊंडसारखा केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
हा व्हिडिओ शहरभर व्हायरल होताच नगरपरिषद प्रशासन लगेच कामाला लागले. मागील दोन दिवसांपासून नगरपरिषदेने ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम हाती घेतले आहे. विशेषतः, मोरा येथील फायर स्टेशन परिसरात साठवण्यात आलेला कचराही जेसीबीच्या मदतीने तातडीने उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलखोल' करणार असल्याचा उमेदवार घाणेकर यांचा इशारा
दरम्यान, या घटनेनंतर उमेदवार भावना घाणेकर यांनी सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे. यापुढेही असेच व्हिडिओ तयार करून नगरपरिषदेच्या कारभाराची 'पोलखोल' करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
"पद नसताना हे काम शक्य झाले आहे. पद मिळाल्यास या परिसरात आणखी मोठे बदल घडवून आणू," असे आश्वासन देत भावना घाणेकर यांनी उरण शहरातील नागरिकांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

.jpg)

Post a Comment
0 Comments