Type Here to Get Search Results !

उरण मध्ये १५ दिवसातून एकदा जनता दरबार

 उरण नगरपरिषदेची नवी नगराध्यक्ष; भावनाताई घाणेकर.


पूजा चव्हाण

उरण दि. २७ डिसेंबर

 नगरपरिषदेत आज नव्या नेतृत्वाची औपचारिक सुरुवात झाली असून नुकत्याच निवडून आलेल्या भावनाताई घाणेकर यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी उरणकर जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





यावेळी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम करताना पंधरा दिवसांतून एकदा जनता दरबार घेण्यात येणार असल्याचं भावनाताई घाणेकर यांनी जाहीर केलं. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, केवळ कार्यालयीन कामकाजापुरते न थांबता स्वतः जनतेमध्ये जाऊन अडचणी जाणून घेतल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com



उरणमधील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, प्रदूषण आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार आहे. जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल, असं भावनाताईंनी सांगितलं.

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर सिल्वर ओक येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर भावनाताई घाणेकर यांनी सांगितलं की, जनतेच्या सेवेसाठी जिथे गरज भासेल तिथे पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळेल.




उरण नगरपरिषदेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, नागरिकांच्या प्रश्नांना थेट न्याय मिळेल, अशी अपेक्षा आता उरणकर व्यक्त करत आहेत.



Post a Comment

0 Comments