पी.एम.श्री शाळा मुळेखंड शाळेची मुंबई दर्शन शैक्षणिक क्षेत्रभेट संपन्न ....
उरण दि ४
उरण बातमीदार
सन २०२५-२६ या वर्षातील पीएम श्री शाळा मुळे खंड या शाळेची पीएम श्री अंतर्गत इयत्ता सहावी सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते,ही सहल मुंबई दर्शन अशी होती, सुरुवातीला मुळेखंड ते बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी भेट देण्यात आली.
या उद्यानात वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला व निसर्ग,प्राणी यावर इतम भूत माहिती मिळविली नंतर नेहरू तारांगण व विज्ञान म्युझियम तसेच गेटवे ऑफ इंडिया ताजमहाल हॉटेल अशा विविध ठिकाणी या सहलीचे मुंबई दर्शन अशा आयोजन असुन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे शैक्षणिक क्षेत्रभेट होती,त्यामध्ये विज्ञान म्युझियममध्ये पुरानाश्मयुग,नवाश्मयुग, पंचमहाभूते मानवी शरीरातील षडविकार,हडप्पा संस्कृती, वेद संस्कृती, गुरुकुल पद्धत, छत्रपती शिवाजी महाराज राजवट,ब्रिटिश राजवट व स्वातंत्र्योत्तर काळ अशी बरीचशी माहिती विद्यार्थ्यांना म्युझियम मध्ये मिळाली. पण नेहरू तारांगणामध्ये सायंकाळी साडेचारचा सौरमंडल शो विद्यार्थ्यांनी पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. गेटवे ऑफ इंडिया व ताजमहाल हॉटेल परिसर नजारा पाहून विद्यार्थी आनंदित झाले होते. ही सहल सकाळी 6 वाजता निघाली होती. मुलांनी एसटी महामंडळाच्या एसटीतून प्रवास करत मुंबईतील ट्रॅफिक,उंच इमारती,उड्डाणपूल विमानतळ, वांद्रे सी_लिंक, नरिमन पॉईंट मंत्रालय इत्यादींची ओळख करून घेतली. विविध गाण्यांवरती ठेका धरत स्पीकर च्या साह्याने आनंद लुटला.
बातम्या आणि जाहिराती साठी uranshahar@gmail.com ला संपर्क करा...
या सहलीसाठी सहकार्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती मुळेखंड,जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग प्राथमिक शिक्षण विभाग,पंचायत समिती उरण कार्यालय, पालक वर्ग यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या सहलीसाठी श्री अमृत मधुकर ठाकूर मुख्याध्यापक, सौ विद्या वाणी मॅडम सौ.दिशा तांडेल मॅडम, सौ अर्चना पाटील मॅडम कुमारी अमिषा ठाकूर यांनी विशेष मेहनत घेऊन यशस्वी केल्याबद्दल सहल प्रमुख आदर्श शिक्षक श्री संजय होळकर सर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सहल निर्विघ्न पणे पार पाडून वेळेत आल्याबद्दल पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.




Post a Comment
0 Comments