फुंडा गावातील बिर्याणीत किडे-आळ्या; रहिवाशांचा संताप उसळला"
उरण तालुक्यातील फुंडा गावातील बिर्याणी वाल्याच्या बिर्याणीत किडे आणि आल्या आढळून आल्याने हाहाकार
फुंडा गावातील एक बिर्याणी वल्याच्या बिर्याणीत किडे आणि आल्या आढळून आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे. उरण चे रहिवासी मोठ्या हौसेने बिर्याणी खायला जातात आणि कार्यक्रम असल्यास घरीच बिर्याणी पार्सल मागवतात, पण हे बिर्याणी वाले रहिवाशांच्या आरोग्याची काळजी न घेता बिर्याणी बनवत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानीय रहिवाशांनी बिर्याणी वाल्याच्या किचनमध्ये जाऊन पाहणी केली असता, तेथे बिर्याणी बनवणारे एकदम गलिच्छ जागेत बिर्याणी बनवताना दिसले. किचनमध्ये अक्षरशः झुरळ फिरताना दिसत होते. बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले आणि तांदूळ देखील खराब अवस्थेत पडलेले होते.
रहिवाशांनी या बाबत उरण तालुक्याच्या प्रशासनाला कळवले असून, बिर्याणी वाल्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण तालुक्याचे तहसीलदार यांनी घटनेची माहिती घेतली असून, बिर्याणी वाल्याच्या किचनची निरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
बिर्याणी वाल्याच्या असलेल्या या अनियमिततेमुळे उरण तालुक्यातील रहिवाशांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. आरोग्य विभाग लक्ष देणार का असा प्रश्न जनता विचारत आहे.
"अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी स्थानिकांनी रहिवाशी दिनेश म्हात्रे यांनी केली.
अशा अन्नामुळे अन्नविषबाधा होऊ शकते
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना धोका
संसर्गजन्य आजारांचा संभव
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
संबंधित फूड अँड ड्रग्स प्रशासन (FDA) कुठे आहे?
परवान्याची तपासणी झाली होती का?
यापूर्वी तक्रारी होत्या का?
"स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. आता तरी संबंधित विभाग जागे होणार का,असा प्रश्न उरण चे रहिवाशी विचारत आहेत."
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
उरण तालुक्यातील फुंडा गावात
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिर्याणी खरेदी केलेल्या ग्राहकांना बिर्याणीत चक्क किडे आणि आळ्या आढळून आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या विश्वासाने आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बिर्याणीवाल्याच्या किचनमध्ये अक्षरशः अस्वच्छतेचा कळस गाठलेला दिसून आला. झुरळांचा वावर, सडलेले मसाले आणि खराब तांदूळ पाहून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या
प्रकारावर प्रशासन काय कारवाई करणार
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment
0 Comments