Type Here to Get Search Results !

उरणमध्ये गॅस सिलेंडर टंचाई; स्थानिक नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

 उरणमध्ये गॅस सिलेंडर टंचाई; स्थानिक नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?




    "उरण मध्ये गॅस गायब!"

     "ब्लॅक मध्ये गॅस पुरवठा?"

उरण |दि. ३० सचिन कजरोळकर 

उरण शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी ५ वाजल्यापासून भारत गॅस एजन्सीसमोर लांबलचक रांगा लागत असून, तासन्तास प्रतीक्षा करूनही नागरिकांना तात्काळ गॅस सिलेंडर मिळत नसल्याची गंभीर समस्या समोर आली आहे.

स्थानिकांच्या मते, ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतरही एजन्सीसमोर ५ ते ६ तास उभे राहून फक्त पावती दिली जाते. त्यानंतर एजन्सीकडून "नंतर सिलेंडर मिळेल" असे सांगितले जाते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकाचा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला असून, अनेक कुटुंबे त्रस्त झाली आहेत.





G

दरम्यान, दुसरीकडे काही हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावर अनधिकृतपणे चालणारे फूड स्टॉल्स—जसे की चायनीज गाड्या, वडापाव स्टॉल्स—यांच्याकडे मात्र गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “स्थानिकांना गॅस मिळत नाही, पण व्यावसायिकांना कसा मिळतो?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

mahaindia24@gmail.com




यामुळे काही स्थानिक हॉटेल व मिठाई दुकानदारांनी गॅसअभावी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवले असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, काही ठिकाणी अनधिकृतपणे गॅस पुरवठा होत असल्याची शंका व्यक्त केली जात असून, काळाबाजार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



 🔷सामान्य नागरिक उपाशी पण काही ठिकाणी हॉटेल, रस्त्यावर चालणारे गॅस सिलेंडर वर चालणारे हात गाड्या बिन्दास्त सुरू जबाबदार कोण 🔷

या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करावी आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Post a Comment

0 Comments