🔷उरणमध्ये धक्कादायक प्रकार: नागरिकांना पिण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा पुरवठा?🔷
पिण्याचे पाणी
उरण | सचिन कजरोळकर
शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासली जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे उरण शहरात समोर आले आहे. अधिकृत तपासणी ही प्रामुख्याने महा जलकुंभातील पाण्यापुरती मर्यादित असताना, नागरिकांना प्रत्यक्षात तलाव, डबकी, गटार आणि अन्य अस्वच्छ स्रोतांतील पाणी पिण्यासाठी दिले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
अलीकडेच उरणमध्ये केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड झाले. बोकडवीरा एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाजवळील पुलाखाली पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली थेट गटारासारखे अस्वच्छ पाणी भरले जात असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. प्राथमिक चौकशीत हे पाणी तलावातून बेकायदेशीररित्या उपसले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन नाहीतर सहा सहा मोटर लावून पाणी माफिया संबंधित अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून हे पाणी चोरीने काढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
😔आरोग्याला धोका निर्माण करणारे गटाराचे पाणी
हे पाणी ट्रॅक्टर आणि टँकरद्वारे विविध ठिकाणी पुरवले जाते. विशेषतः बांधकाम (विकास) साईटवर डबक्यातील, गाड्यांमधील साचलेले आणि अगदी गटारातील पाणीही वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच पाणी कंटेनर गोदाम , CFS यार्ड मध्ये पिण्या साठी वापरले जाते, यामुळे CFS मध्ये येणारे सी. एच. ए. सर्व्हेर, हमाल तसेच उरण च्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय, उरण परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर खोल बोरिंग करून भूगर्भातील जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास केला जात आहे.
“पाणी माफिया” सक्रिय असून नैसर्गिक जलस्रोतांवर त्यांचा ताबा वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
दरम्यान, या संदर्भात माहिती अधिकाराखाली मागवलेल्या काही महत्त्वाच्या माहितीची पूर्तता प्रशासनाकडून अद्याप झालेली नाही, असेही समजते.
⚠️ नागरिकांना आवाहन
आपल्या परिसरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा, बेकायदेशीर पाणी उपसा किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ माहिती द्या.
आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नक्कीच करू.
स्वच्छ पाणी, निरोगी जीवन — ही जबाबदारी आपलीही आहे.
संपादक:उरण शहर ~सचिन कजरोळकर.


Post a Comment
0 Comments