Type Here to Get Search Results !

उरण मध्ये काळी टोपी वाद आमदारांच्या वार्तानावर प्रश्नचिन्ह

 महाराष्ट्र दिनी उरणमध्ये धक्कादायक प्रकार; आमदारांच्या वर्तनावर संतापाचा स्फोट




 काळ्या टोपीचे रहस्य तरी काय!

उरण सचिन काजरोळकर.

महाराष्ट्र दिन—राज्याच्या अभिमानाचा, शौर्याचा आणि कर्तृत्वाचा दिवस. पण याच दिवशी उरणमध्ये घडलेला प्रकार संतापजनक ठरत आहे. ज्या दिवशी लोकप्रतिनिधींनी आदर्श घालून द्यायला हवा, त्या दिवशीच जबाबदारीचा विसर पडल्याचा आरोप होत आहे.

 उरण च्या आमदाराची दादागिरी ?

काळी टोपी घालून ध्वजवंदन.

उरणचे आमदार महेश बालदी यांनी काळी टोपी घालून झेंडावंदन केल्याचा आरोप समोर आला असून नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ही केवळ चूक नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा उघड अपमान आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर.


प्रकरण इथेच थांबत नाही. सर्वाधिक वादग्रस्त बाब म्हणजे आमदारांनी तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसत त्यांना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार केवळ शिष्टाचाराचा भंग नाही, तर प्रशासनाच्या सन्मानावर थेट घाव असल्याची टीका जोर धरत आहे.


लोकप्रतिनिधी हे जनतेचे आवाज असतात—प्रशासन चालवणारे नव्हे. तहसीलदार हे शासनव्यवस्थेतील महत्त्वाचे अधिकारी आहेत, ज्यांच्या पदासाठी हजारो तरुण MPSC आणि UPSC ची कठोर तयारी करतात. अशा पदाच्या खुर्चीवर  बसणे म्हणजे केवळ अधिकाराचा दिखावा नव्हे, तर त्या पदाच्या प्रतिष्ठेचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.


प्रशासकीय शिस्त, पदांची मर्यादा आणि परस्पर आदर ही लोकशाहीची मूलभूत तत्त्वे आहेत. मात्र उरणमधील या घटनेने या तत्त्वांनाच धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. सत्तेच्या जोरावर मर्यादा ओलांडल्या जात असतील, तर हा प्रकार लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सीमारेषा पुन्हा अधोरेखित करण्याची गरज निर्माण झाली आहे—अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments