भांडुप पूर्व ज्येष्ठ नागरिक कार्यालयात १२५ ज्येष्ठांना एसटी स्मार्ट पासचे वाटप; फेस्कॉमचे मानले आभार
भांडुप (प्रतिनिधी): भांडुप पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तब्बल १२५ ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बस प्रवासासाठी स्मार्ट पासचे वाटप करण्यात आले.
स्मार्ट पासमुळे ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवास करताना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि जलद पद्धतीने घेता येणार आहे. त्यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच हा उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल फेस्कॉम (FASCOM) संस्थेचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
यापुढेही अशाच लोकहिताच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि सर्व लाभार्थींनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले.
.jpg)

Post a Comment
0 Comments