Type Here to Get Search Results !

उरण तालुक्यातील चिरनेर येथे ACB ची मोठी कारवाई;

 



उरण तालुक्यातील चिरनेर येथे ACB ची मोठी कारवाई; सातबाऱ्यावरील वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठीसह ,कोतवाल रंगेहाथ पकडले.

उरण दिनांक ६ (प्रविण पाटील)


उरण तालुक्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक  ६ आक्टोबर रोजा दुपारी ३ ते ४ वाजताचा दरम्यान मोठी कारवाई करत कोप्रोली मंडळ अधिकारी के.डी. मोहिते, सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी आणि कोतवाल नथुराम कातकरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाई मुळे उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करायची होती. त्यासाठी कोप्रोली मंडळ अधिकारी आणि चिरनेर तलाठ्याने संगनमत करून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबी चे उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रथम पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता  सजा चिरनेर तलाठी कार्यालयात अत्यंत गुप्तपणे सापळा रचण्यात आला. कोतवालामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी च्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासासाठी उरण पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान कारवाईच्या वेळी तलाठी जयहिंद कोळी यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगून घटनास्थळावरून पळ काढल्याची चर्चा आहे. तसेच मंडळ अधिकारी के.डी. मोहिते यांनी सन २०२३-२४ मध्ये सजा चिरनेर येथे काम पाहत असताना पगार पनवेल तालुक्यातील सजा पारगाव कार्यालयातून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर



 महसूल विभागाच्या या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला असून भाजप सरकारची प्रतिमा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मलीन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नवी मुंबई एसीबी  ची ही उरण तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

तसेच  के.डी मोहिते  यांनी  सजा वेश्वी आणि म्हावली  तलाठी असताना अनेक  गैर व्यवहार केले आहेत. अशा अनेक  व्यवहारातुन  बेनामी करोडी ची  माय गोळा केली असुन मर्सिडिझ सारखा अलिशान  गाडयाचा ताफा आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी  उरण तालुक्यातील शेतकरी करत आहेत..

Post a Comment

0 Comments