Type Here to Get Search Results !

No title

१० नोव्हेंबरपासून जुना खोपटा पुल  वाहतुकीस खुला होणार.




पुलाचा खर्च ५ कोटी वरून १० कोटी रुपयांवर ?

दिनांक २२ आक्टोबर (प्रविण पाटील)
उरण तालुक्यातील पुर्वविभागाला  दळणवळणासाठी प्रामुख्याने जोडणारा जुना पुल सन १९९५ मध्ये बांधण्यात आला होता.सतत  होणारी वाहतूक कोंडी ,गोदामाची वाढलेली संख्या त्यामुळे वाहतूक वर रहदारीवर या एकेरी पुलावर प्रचंड ताण पडत असल्याने  दुसऱ्या  पुलाची निर्मिती १५ वर्षापुर्वी करण्यात आली तरीही वाहतूक कोंडी जनतेचा पाचवी लाच होती.
सन १९९५ साली बांधण्यात आलेला पुल उरणचा दोन्ही भागांना जोडणारा मुख्य दुवा होता.मागील काही वर्षांपासून प्रंचड वाढणाऱ्या वाहतूकीमुळे  पुलाची मोठी दुरावस्था झाली होती.पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता पुलाचा आतील भागाला प्रंचड प्रमाणात तडे गेले होते तर बेअरिग पुर्णपणे निकामी झाला होता.सन १९९५ चा काळातील पुलाचा जुना पध्दतील बेंअरिग उपलब्ध नसल्यासने विशेष प्रयत्न करुन ४ सेंट्रल बेंअरिग  आणि ८ रोलर शॅकर बेंअरिग कलकत्त्यात बनवून घेण्यात आला.तडे गेलेल्या भागाला ग्रो-कट करून इपाॅक्सी, ग्राउट इपॉक्सी, मोटार कार्बन लॅमिनेट आणि फायबर लॅपिग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पुलाचे काम प्रगतीपथावर असुन १० नोव्हेंबर ला प्रवाशांचा सेवेसाठी,वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागने दिली आहे.
सदर पुलाचा अंदाजपत्रक दुरुस्तीचा खर्च ५ कोटी रुपये होता तर  कालावधी ३ महिन्याचा होता.त्याची तरतुद आमदार निधीतून करण्यात आली आहे.
मागील डिसेंबर २०२५ ला पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.एका वर्षात पुलाचा खर्च ५ कोटी रुपयांवरून १० कोटी  झाल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments