Type Here to Get Search Results !

रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जनजागृतीसाठी न्ह्यावा शेवा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत चित्रकला स्पर्धा आयोजित

 रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जनजागृतीसाठी न्ह्यावा शेवा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत चित्रकला स्पर्धा आयोजित.







वार्ताहर पूजा चव्हाण 

दिनांक 26 जानेवारी 2025 

 देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई न्हावा शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली "एम,एम, विद्यालयात पोलीस आयुक्तालय नवी मुंबई तर्फे आयोजित रस्ते सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत विदयार्थीनी बहूसंख्येने सहभागी झाले होते.


या चित्रकला स्पर्धेच्या उद्देश वाहतूकी च्या नियमांचे पालन करण्यात यावे व विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे या साठी या चित्रकला स्पर्धेच्या आयोजित करण्यात आले होते.या वेळी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जी.एम. मुजावर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास त्यांचे सहकारी श्री मयुर पाटील,श्री किरण म्हात्रे, श्री ललित शिरसाट, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रणिता गोळे, पर्यवेक्षक श्री अरुण जोशी, सहाय्यक शिक्षक परेश  पावसकर व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री अरुण जोशी सर यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांना जी.एम.मुजावर  यांनी रस्ता सुरक्षा बाबत अनमोल मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments