Type Here to Get Search Results !

वीर वाजेकर महाविद्यालयात नवीन बदललेल्या कायद्यांची जनजागृती कार्यशाळा संपन्न

 “वीर वाजेकर महाविद्यालयात नवीन बदललेल्या कायद्यांची जनजागृती कार्यशाळा संपन्न” 




वार्ताहर पूजा चव्हाण 

उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग, फुंडे  येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, न्हावा शेवा पोलीस ठाणे व अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती, वीर वाजेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन बदललेल्या कायदेविषयक शिबीर व सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.बी.टी.ओवे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या अभियोक्ता मा.प्राजक्ता देशमुख साधन व्यक्ती व्यक्ती म्हणून लाभले . कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी-प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ओवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सायबर गुन्ह्याचे स्वरूप,सायबर गुन्हेगार वापरत असणारी तंत्रे आणि त्यापासून सावधगिरी बाळगण्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन युवक-युवतींनी विविध समाजमाध्यमे हाताळत असतांना,विशेष खबरदारी घ्यावी.खोटे ओळख खाते (Fake Accounts) डिजिटल अरेस्ट करण्याचे प्रकार, डीप फेक, व्हिडीओ मोर्फिंग, ऑनलाईन गेमिंग,  सट्टा, धमकीचे फोन, ड्रीम इलेवन, ड्रीम सर्कल, जंगली रमी यासारख्या फसव्या खेळांपासून सावध रहावे.

उच्च न्यायालयाच्या अभियोक्ता श्रीमती. प्राजक्ता देशमुख यांनी सी.पी.सी. आणि सी.आर.पी.सी. यामधील विविध कायद्यांचा परामर्श घेतांना काळानुरूप या कायद्यांमध्ये कसे-कसे बद्दल होत गेलेले आहेत,याचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.बाल गुन्हेगारांसाठीचे कायदे,तृतीय पंथीय व्यक्तींसाठी कायद्यात झालेले बद्दल स्त्री अत्याचार विरोधी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आर्थिक फसवणुकीचे आधुनिक प्रकार व त्याविषयक कायदे आणि विशेषतः स्त्री-पुरुष नात्यातील ताण-तणावांवर आणि शारीरिकसंबंधांवर नवीन बदलणारे कायदे काय सांगत आहेत,याविषयी  महाविद्यालयीन मुला-मुलीनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र-प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी सर्व नागरिकांनी आपले हक्क आणि कर्तव्य यांच्या जोडीला कायद्याच्या दृष्टीने पुरेसे साक्षर असणे गरजेचे असल्याचे सांगितले.महाविद्यालयात शिकत असतांना शिस्तीचे उल्लंघन होणार नाही,  तसेच मला मुलींनी आपसात वागताना बोलतांना आपल्या विषयी तक्रार येणार नाही,असे वर्तन आपण कायम ठेवले पाहिजे, आपल्या आचार-विचारात नितीमत्ता, प्रामाणिकपणा ठेऊन आपल्याकडून कायदेबाह्य वर्तन होणारच नाही अशी काळजी घेण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.गजानन चव्हाण यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.पंकज भोये यांनी केले. तर सूत्र संचालन प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले.या कार्यशाळेला प्रा.संतोष देसाई यांच्यासह  विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments