शनिवार दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उलवे नोड येथील जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे पी. एम. श्री. रा. जि. प. शाळा मुळेखंड येथील १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना एग्झाम पॅड आणि कंपास बॉक्सचं वाटप करण्यात आलं.
सुरूवातीला शाळेतील मुलींनी मंडळाच्या सदस्यांचे लेझीम नृत्याविष्कार व पुष्पवृष्टीने औक्षण करून स्वागत केले.तदनंतर छत्रपती शिवाजीमहाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे पवित्र तुळसीचे रोप व शाल देऊन सन्मान करण्यात आला. तद्नंतर इयत्तानिहाय सर्व मुलांना शालेय पॅडचे वाटप करण्यात आले.तद्नंतर मुळेखंड मराठी शाळेत सुरू असणारे विविध शैक्षणिक उपक्रम आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पहात आहोत.या शाळेत शिक्षण प्रवाहात येणारी सर्व मुले ही आर्थिक दुर्बल घटक व सर्व सामान्य घरातील असतात.त्यामुळेच आमच्या मंडळाकडून शिक्षण प्रवाहात मुलांनी टिकून रहाण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.त्यातीलच हा उपक्रम मुळेखंड शाळेत राबविण्याची संधी आदर्श शिक्षक श्री.संजय होळकर सर यांच्या माध्यमातून मिळाली.याचा आनंद वाटतो. शालेय परिसरात सुरू असणारे सुशोभीकरण,रंगरंगोटी,दुरुस्ती पहाता एक सुंदर शाळा ही उरण तालुक्यातील मुळेखंड शाळा असेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
यावेळी आपल्या जाणीवचे सदस्य श्री. किरण मढवी , सुनिल ठाकूर, रितेश पाटील , सुधीर भोईर , चिंतामण पाटील , अंजू पाटील , विनया पाटील , जीवांश पाटील , रविंद्र भोईर , सचिन भगत , सपना भगत , सान्वी भगत , अनिष पाटील , नंदकुमार वाजेकर, ज्ञानेश्वर भोईर आणि भानुदास वास्कर,SMC अध्यक्षा सौ.मनिषा म्हात्रे,श्री.महेश म्हात्रे,श्रीम.जयवंती ठाकूर आई आदी उपस्थित होते.*
विशेष आजचा हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.अमृत ठाकूर सर व सौ.विद्या वाणी मॅडम प्रशिक्षणाला असून देखील एवढा भव्य कार्यक्रम शाळेतील सौ.दिशा तांडेल मॅडम व सौ.अर्चना पाटील मॅडम या दोन महिला शिक्षक भगिनींनी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शाळेच्या पालकाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात येत आहे. शेवटी सौ.दिशा तांडेल मॅडम यांनी या संस्थेचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



Post a Comment
0 Comments