संत रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई.
स्थानिक पंचायत उरण तर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती आणि विद्यार्थी गुण गौरव सोहळा संपन्न .
अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण दीप प्रज्वलित करताना
उरण दि.९ भारतातील थोर समाज सुधारक, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती रोहीदास समाज पंचायत संघ उरण यांच्या माध्यमातून ओमकार आपटमेंट कोटनाका (बालई ) उरण येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत हरी चव्हाण यांनी दिप प्रज्वलन केले. ज्येष्ठ सल्लागार श्री.सखाराम चव्हाण यांनी प्रतिमापूजन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावनाश्री.महेंद्र चव्हाण यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे निवृत्त मुख्याध्यापक N.i स्कूल कोठावले सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संत शिरोमणी गुरु रविदास यांनी समाजातील वाईट रूढी, वाईट परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान कशा प्रकारे दूर केल्या, समाज प्रबोधन कशा प्रकारे केले याची माहिती आपल्या मनोगतातून दिली. १३७६ मध्ये रविदासांचा जन्म झाला, वयाचा १३ व्या वर्षी त्यांचे लंग्न झाले.ऐसा चाहू राज मै सब को मिले सामान अधिकार, मानवाचा मूलभूत गरजा आणि विद्यार्थ्यांनी खचून न जाता अपयश हि यशाची पहिली पायरी आहे यावर मार्गदर्शन दिले.
तर बाबल्या चव्हाण यांनी आपल्या समाजातील मुलांनी नोकरी चा मागे ना लागता उदयोजक बनण्या साठी मार्गदर्शन केले.
शिकाल तर टिकाल. शिक्षणा शिवाय पर्याय नाही या बदल मार्गदर्शन केले.
तदनंतर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. एकंदरीत उरण मध्ये संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा , उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या रुपाली चव्हाण व महिला यांनी मेहनत घेतली.
तसेच रोहिदास समाज स्थानिक पंचायत संघ उरण चे अध्यक्ष चंद्रकांत हरी चव्हाण , उपाध्यक्ष दशरथ चव्हाण, चिटणिस महेंद्र सखाराम चव्हाण,उपचिटणीस रवींद्र पेवेकर , कोषाध्यक्ष शैलेश चव्हाण, निमंत्रक योगेश जानवळकर ,सल्लागार - बाबल्या चव्हाण, सखाराम चव्हाण.सदस्य नरेश चव्हाण, योगेश चव्हाण, दिनेश, संदेश जानवळकर, जितू चव्हाण,महेंद्र पोवार, प्रितम चव्हाण, दिनेश जानवळकर ,अमित चव्हाण, आदित्य चव्हाण, जतीन चव्हाण , यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
.jpg)






Post a Comment
0 Comments