Type Here to Get Search Results !

पुनाडे येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा

 पुनाडे येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा.....

वार्ताहर - अजय शिवकर 

केळवणे पनवेल


       ग्रामस्थांच्या योगदानतून ना.शं.पाटील या वयोवृद्ध शिक्षकाच्या आयोजनातून  ४१ गूणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात रामनवमीचे औचित्य साधून पुनाडे या गावी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य रायगडभूषण प्रा एल बी पाटील होते.ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, पुनाडे हे गाव उरणच्या शेवटाला (टोकाला) असून गुणीजनांची निवड करून सत्कार करून प्रेरणादायी ठरणारे पहिल्या क्रमांकाचे कार्य करीत आहे. आणि भाषणाचा शेवट आगरी बोलीत एलबींनी पसायदान गाऊन केले.

        


        या भागातील ज्येष्ठ शिक्षक ग.ह.ठाकूर म्हणाले, गुणवंतांची आदर्श ही पिढ्यां घडवितात हे उदाहरणासह स्पष्ट केले.उद्घाटन करताना गट विस्तार अधिकारी प्रियांका म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. 

     

     ग्रामस्थ आणि पाहुण्यांकडून ना.शं.पाटील गुरुजींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कोमसाप उरणचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक के.पा.म्हात्रे‌, महादेव पाटील,उषा तांडेल, अक्षता पाटील, घनशाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

  कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन देविदास पाटीलसर यांनी केले.






Post a Comment

0 Comments