Type Here to Get Search Results !

पेण तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा संपन्न

 पेण तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा संपन्न.

 


वार्ताहर पूजा चव्हाण

बुधवार दि.१४/०५/२०२५ रोजी

पेण तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाने आयोजित पेण तालुक्यामध्ये चौथी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी झाली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस वंदन करून, छत्रपती संभाजीराजे पालखीचे पूजन करून महाराजांच्या चौकातून पालखी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पालखी नगरपालिकेच्या समोरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये  वारकरी संप्रदाय इचलगिरी रसल संप्रदाय नित्य पाठण भजन मंडळ मोठे वडाव यांच्या वारकरी गजरा सोबत पोचली.




धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक शांती निकेतन सोसायटी येथे आदरपूर्वक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रसंघ प्रस्तुत शिवकालीन लाठीकाठी तलवार दांडपट्टा चालविण्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रम ऐतिहासिक पद्धतीने जुन्या चाली परंपरा जपत जतन करत पार पाडण्यात आले सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थित अखिल भारतीय छावा संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष धनंजय घरत व स्वप्निल घरत, तसेच शिवतेज युवा फाउंडेशन अध्यक्ष हेमंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांदाताई म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील, छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा सल्लागार दिलीप साळवी साहेब, सचिव दीपक संसारे, सहसचिव राजेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य वाघ, पेण तालुका महिला आघाडी अश्विनीताई ठाकूर, पेण उपतालुका उपध्यक्ष संजय भोईर, उपशहर अध्यक्ष गिरीश म्हात्रे तालुका सल्लागार राम ठाकूर, बालकृष्ण ठाकूर, विनायक ठाकूर, गणेश म्हात्रे, विजय ठाकूर समाज सेवक उपस्थित होते छावा संघटना अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या सांगतेने सदर कार्यक्रमास शेवटी विराम देण्यात आले.


https://chat.whatsapp.com/D4aUdEiNVvlJNkiwQBdbZJ


Post a Comment

0 Comments