उरण तालुक्यातील साप्ताहिक बाजार बंद करा !
उरण मधील नागरिकांची मागणी
उरण/प्रतिनिधी
उरण तालुक्यात साप्ताहिक बाजार हे मोठ्या प्रमाणात भरवण्यात येत आहेत त्यामुळे या बाजारात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
विशेष या बाजारात विक्रीसाठी येणारे हे बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यामुळे या परप्रांतीयाकडून खरेदी केलेल्या वस्तू बहुतेक वेळा बनावट देखील असतात त्या मुळे नागरिकांची या परप्रांतीय काढून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.
तसेच या बाजारात खरेदी करण्यास येणारे नागरिक आपली वाहने बेशिस्त पणे कोणत्याही ठिकाणी लावून खरेदीला जात असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
या वाहतूक कोंडीमुळे बहुतेक वेळेस शाब्दिक बाचा बाची, हाणामारी असे वाद देखील होत असतात यातूनच एखादी मोठी घटना होण्याची शक्यता देखील आपण नाकारू शकत नाही.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उरण मध्ये या बाजारात विक्री साठी येणारे परप्रांतीयांची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने आपल्या सुरक्षितेचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील साप्ताहिक बाजार लवकरात लवकर बंद करावे असे समस्त नागरिकांची मागणी आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments