Type Here to Get Search Results !

नागरी संरक्षणदलाचे प्रशिक्षण शिबीर मोठया उत्साहात संपन्न

 नागरी संरक्षणदलाचे प्रशिक्षण शिबीर मोठया  उत्साहात संपन्न



वार्ताहर पुजा चव्हाण -

          जम्मू- काश्मिरमधील पहलगामयेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 28 पर्यटकांचा मृत्यू झाले,  यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदिजीनी या भ्याड हल्ल्याचा निषेद करीत “ऑपरेशन सिंदूर”  व्दारे आपल्या जवानांना या भ्याड हल्याला प्रतीउत्तरदेण्याचे आदेश दिलेअसता, आपल्या शूर जवानांनी याचा बदला घेत अतिरेकी संघटनांची अनेक ठाणी नस्तेनाभूत केली.

 इतकेच नाहीतर पाकिस्तानला करारानुसार देण्यात येणारे सिंधूनदीचे पाणीही बंदकरण्याचा निर्णय घेतलायामुळे चवताळलेल्या पाकीस्थान केव्हाही युद्ध पुकारण्याची श्यक्यता लक्षात घेता युद्धजन्य परिस्थितीलाव दैनंदिन जीवनात येत असलेल्या वेगवेगळ्या आपत्तीला सामोरे जाण्या साठी  पंतप्रधान नरेंद्र मोदीव गृहमंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशाने नागरी संरक्षणदलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले त्यादेशानुसार रायगड जिल्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडजिल्हा आपत्ती व्यवस्थापन मुख्यालय उरण कार्यालयाला  युद्धजन्यस्थिती व अन्य आपत्तीजन्य परिस्थिती मध्येनागरिकांचे बचावकार्य करण्याच्या दृष्टीने वर्षाला 360 स्वयंसेवक बनविण्याचे आदेश देण्यात आले होते.

  त्यानुसर उरण तालुक्यात पहिल्या प्रशिक्षणशिबिराचे आयोजन दि.18ते 24 जून 2025 या कालावधीत मधील “नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल”मध्ये आयोजित करण्यात आलें होते.



 या शिबिरा अंतर्गत दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या विविध आपत्तीसंदर्भात  प्रशिक्षणार्थीना नागरीसंरक्षण दलाचे माजी एडीसी एम.के.म्हात्रे, एडीसी शशिकांत शिरसाठ उरण.हारेश्र्वर ठाकूर,श्रीमती ज्योती म्हत्रे.श्री.गोंधळी यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम शिकविले बरोबरीने उरण येथील सिडको अग्नी शमनदलाचे प्रमुख श्री कांबळे सरांनी फायरची गाडी आणून प्रत्याक्षीके दाखून आग विझविण्याबाबत प्रशिक्षण दिले अशाप्रकारे हे पहिले शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले असून या शिबिरातएकूण 35 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता या मध्ये महिलांची संख्या ही लाक्षणीय होती.




           या शिबिराचे उदघाटन रायगड जिल्ह्याचे मुख्य वार्डन नवीन राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोप सठी प्रमुख पाहुणे म्हणून पोर्ट विभागाचे साह्य्य्क पोलीस आयुक्त डॉ.विशाल पाटील सर उरण पोलीस ठ्ण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ सर एडीसी शशिकांत शिरसाठ नगराजशेठस्कूलचे मुख्य व्यवस्थापक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील स्कूलच्या प्रिन्सिपॉल श्रीमती ज्योती म्हात्रे एच.एम.भोईर  ,श्री.गोंधळी सर,केतन म्ह्त्रे,हरेश्वर ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी बंदर विभागाचे साह्य्य्क पोलीस आयुक्त डॉ.विशाल पाटील यांनी आपले मार्गदर्शन पर विचार मांडताना नगरीसंरक्षण दलाचे कार्य व महत्व याबाबत नाहीती दिली व उरण हे अतिसवेदनासील परीसर असल्याचे सांगितले,व प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना.तर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनीही या वेळी आपले मार्गदर्शनपर विचार मांडून नागरी संरक्षण दलाच्या कामाची माहिती सांगितली व प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले यावेळी  काही प्रशिक्षणार्थीनी आपली मनोगते व्यक्त  केली,महाराष्ट्र राज्यगीताने शुभारंभ करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराज शेठस्कूलचे मुख्य व्यवस्थापक तथा जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील यांनी केले तर प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानलेया सुरेख कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दृष्टी कोळी मॅडम यांनी केले.

Post a Comment

0 Comments