पीएमश्री शाळा मुळेखंड शाळेत माहे जुलै 2025 ची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
वार्ताहर पुजा चव्हाण
दिनांक 16 जुलै 2025 रोजी नवीन शेवे केंद्राची माहे जुलै 2025 ची शिक्षण परिषद तालुक्यातील पीएमश्री म्हणून नावाजलेल्या शाळा मुळेखंड शाळेत संपन्न झाली. या कार्यक्रमाला नवीन शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री शंकर म्हात्रे सर, श्री. मुकेश महाजन सर, श्री.गुरुनाथ ठोंबरे विषय साधन व्यक्ती पं स उरण, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मनीषा ताई म्हात्रे, स्थानिक प्राधिकरण सदस्या सौ. उज्वलाताई म्हात्रे, शिक्षण प्रेमी नागरिक सौ. अनुताई पाटील, ज्येष्ठ सदस्य श्री. महेश म्हात्रे, ज्येष्ठ समाज सेवक श्री.जगदीश म्हात्रे सौ. सुजाता ताई होळकर,सौ.पूजा म्हात्रे, ओमसाई महिला बचत गट सर्व महिला भगिनी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक, सहशिक्षक, बंधू-भगिनी, अंगणवाडी ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीताने केली. नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून उद्घाटन करण्यात आले. विशेष सत्कार श्री. सुभाष पाटील नवनियुक्त अध्यक्ष सिडको कामगार युनियन सौ.अनुताई पाटील, सौ.उज्वलाताई म्हात्रे तसेच श्री रमण पंडित सर व शर्मिला गावंड मॅडम यांचा करण्यात आला. त्यानंतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना एकत्रित बोलवून मुळेखंड शाळेच्या वतीने केंद्रातील शाळांचे विविध फुलझाडे व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या स्वागताच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ज्योती गवळी इयत्ता सातवी या विद्यार्थिनींने केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर यांनी केले. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री शंकर म्हात्रे सर यांनी सर्व शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. मार्गदर्शन केले. तसेच जिल्हास्तरावर झालेल्या सभेचा इतिवृत्तांत सादर करून जिल्ह्यामध्ये मुळेखंड शाळेचे नाव या अग्रस्थानी आहे हे अभिमानाने सांगितले.
सदर ही शाळा आपल्या केंद्रात आहे, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला आलेला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे अभिनंदन केले. दुपार सत्रात एक तास शिक्षकांसाठी यामध्ये शिक्षकांच्या अंगी असणारे विविध कलागुण सादरीकरण तासिका घेण्यात आली. यामध्ये श्री अमृत ठाकूर सर, श्री. कल्याण कोळी सर, श्री वासुदेव म्हात्रे सर ,श्री काशिनाथ म्हात्रे सर, श्री रमण पंडित सर, श्री मच्छिंद्र म्हात्रे सर, श्री कल्पेश ठाकूर सर व अन्य शिक्षकांनी आपल्या रचना सादर केल्या. शेवटी या शाळेने केलेला कायापालट हा वाखण्याजोगा असून शाळेने सर्व प्रकारचे बदल केलेले आहेत. शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व हिरवागार असून मन प्रसन्न होते. असे मत या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री मच्छिंद्र म्हात्रे सर यांनी मांडले व सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शाळेच्या वतीने आभार या शाळेचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री.संजय होळकर सर यांनी मांडले. शेवटी राष्ट्रीय गीताने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली. ही शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर, सौ.विद्या वाणी मॅडम, सौ दिशा तांडेल मॅडम,श्री.संजय होळकर सर ,सौ. अर्चना पाटील मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती व ओम साई महिला बचत गट अध्यक्षा सौ.अस्मिता म्हात्रे ताई व सर्व महिला भगिनी, शाळेतील विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.





Post a Comment
0 Comments