Type Here to Get Search Results !

उरणचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय इतके सुंदर आणि स्वच्छ कसे

 उरण चे  सरकारी रुग्णालय इतके स्वच्छ आणि सुंदर म्हणूनच कि काय तालुक्यात,जिल्हात च नव्हे तर महाराष्टतून रुग्ण आपल्या् उरण मध्ये ऍडमिट होण्या साठी येत असतात. इतकं सुंदर इंदिरा गांधी रुग्णालय.


दिवसा सुरक्षा रक्षक नाही, रात्री पण सुरक्षा रक्षक नाही. मेन गेट बंद होत नाही. १ डॉक्टर, १नर्स, १मावशी असे तिघांचा जीवावर रामभरोसे चालतंय रुग्णालय. त्यात पण मावशी  रात्री झोपायलाच येतात. अस रुगणाचे नातेवाईक सांगतात, पुरुष वॉर्ड  मध्ये सर्व खाटा भरलेले दिसतात इतके रुग्ण असताना हॉस्पिटल ची  

 परिस्थिती इतकी बिकट कशी.

 महिला कक्ष मध्ये नर्स किव्हा मावशी ची आवशकता असताना  कोणीही दिसत नाहीत. महिला कक्ष त एखाद्या रुग्ण महिलेस  डॉक्टर ला बोलावण्या साठी मावशी किव्हा नर्सची आवश्यक असताना स्वतः रुग्ण ला कक्षा चा बाहेर  गेट पर्यत याव लागते

दाताचे डॉक्टर तर त्यांचा टाईम कोणालाच माहित नाही रुग्णांना सकाळी कधी येतात कधी जातात काहीच समाजत नाही.

 ज्या पेशंट ला भेटतील त्यांना खुशाल सांगतात हि ट्रीट्टमेंट आपल्या कडे होतं नाही, प्राव्हेट मध्ये करा..

रात्री च्या वेळेस डॉक्टर २०, ३०  मिनीटानंतर भेटतात.  डॉक्टरांना बोलावण्या साठी तिथे रुग्णालयाचा कोणताचा स्टाफ नसतो.

 

टॉयलेट, बाथरूम ची तर आवस्था खूपच बिकट आहे.



 केंद्रात Bjp, राज्यात Bjp आणि उरण विधानसभा चे आमदार पण Bjp चे पण सरकार ला ह्या रुग्णालयात लक्ष द्यायला का कंटाळा येतोय कोणास ठाऊक. Bjp चे आमदार ह्याचा घरा पासुन २ मिनिटाचा अंतरावर रुग्णालय आहे, तरी पण रुग्णालय ची अवस्था अशी कशी ह्याचा विचार उरण, रायगड मधले रहिवाशी करताना दिसतात, गेली ६ वर्ष आमदार म्हणून मीरवताना साधं रुग्णालयाची अवस्था दिसत नाही असा सवाल उरणकर करताआहेत.

आमदार साहेब, तहसीलदार,मुख्य अधिकारी उरण नगर परीक्षत कोणी तरी लक्ष घालून उरण करांच्या समस्या सोडव्यावा हि विनंती...

आपलाच एक उरणकर...



Post a Comment

0 Comments