पागोटे येथे झालेल्या मानाच्या जलतरण स्पर्धेत आर्यन मोरखडकर ठरला अव्व्ल स्पर्धक.
वार्ताहर पूजा चव्हाण.
उरण तालुक्यातील पागोटे गावचे युवा सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्या सौजन्याने, कुणाल पाटील युवा सामाजिक संथा यांच्या वतीने शुक्रवारी पागोटे गावातील तलावामध्ये मानाची जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती. आगरी, कोळ्यांच्या मानाचा सण नारळी पौर्णिमेचे अवचित्य साधून या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. पागोटे, कुंडेगाव, फुंडे हायस्कुल, जेएनपीए हायस्कुल आणि उरण तालुका खुला गट आशी गटवारी करून या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी माजी आमदार मनोहर भोईर, भावनाताई घाणेकर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा, रामदास शेवाळे उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सरपंच कुणाल पाटील यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाकरिता अनेक उपक्रम राबविण येत आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी
mahaindia24@gmail.com.
uranshahar@gmail.com
विकासाच्या दृष्टीने पागोटे गाव एक विकसित गाव म्हणून पुढे यावे या हेतूने अधिकाधिक उपक्रम राबवून गावाच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सरपंच कुणाल पाटील यांनी कुणाल पाटील सामाजिक संस्थेच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्याभरातून नागरिक गावात येऊन आपले पागोटे गाव आणि आपल्या गावाची ओळख सर्वांना व्हावी हा एक हेतू सरपंच कुणाल पाटील यांचा या स्पर्धा घेण्यामागे होता. स्पर्धा अधिक रंजक होण्यासाठी "स्टेप आर्ट डान्स अकादमी" यांच्यावातीने नृत्य कलाअविष्कार सादर करण्यात आले. तर दहीहंडी पाथकांच्यावतीने मानवी मनोरे रचून दहीहंडी खेळाचे थारारक प्रत्यक्षिके दाखविण्यात आली. गटवारीने घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धा अत्यंत चुरशिच्या झाल्या तर या स्पर्धेचा मुख्य भाग म्हणजे खुल्या गटातील स्पर्धा. या गटामध्ये चतुर्थी क्रमांकाचा मानकरी ठरला तेजस शिंदे, तर तिसरा क्रमांक वेदांत पाटील याने पटकावला, दुसऱ्या क्रमांकाचे स्थान जयदीप सिंग याने मिळवले असून, आर्यन मोडखरकर याने या स्पर्धेचे अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या स्पर्धाकांचे भरभरून कौतुक या वेळी करण्यात आले.

.jpg)
Post a Comment
0 Comments