Type Here to Get Search Results !

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.

 टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.





उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )

पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी  यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता भगत , सर्व सीएचओ, औषध निर्माण अधिकारी श्री. थळे,आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायतचे सर्व टार्गेट पूर्ण करून घेण्याबाबत तसेच प्रत्येक उपकेंद्र व ग्रामपंचायत अंतर्गत टीबी विषयी जन जागृती करिता करावयाच्या बाबींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.


 उपचारावरील रुग्णांना उपचार पूर्ण करून घेण्याबाबत चे नियोजन,आर्थिक व सामाजिक आधार देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत वर जबाबदारी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments