Type Here to Get Search Results !

भक्तिमय वातावरणात चव्हाणवाडी राजाचे उत्साहात विसर्जन

भक्तिमय वातावरणात "चव्हाणवाडी चा राजाचे" उत्साहात विसर्जन.

आनंद, भक्तिभाव आणि उत्साहात उरण कोटनाका,चव्हाणवाडी आठवण आपटमेंट येथे  "चव्हाणवाडी चा राजाचे" आगमन झाले होते.

गणपती बाप्पाच्या आगमनाने वाडीत आनंदमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते,परंपरेनुसार पूजाविधी पार पडला 



उरण तालुक्यातील मान्यवरानी राजाचे दर्शन घेतले.

श्री. चे दर्शन घेण्या साठी उरण चे माजी नगराध्यक्ष रवी शेठ भोईर  तसेच भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आणि चव्हाण कुटुंबातील जेष्ठ सभासद सल्लागार उपस्थित होते.


तसेच माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे यांनी  "चव्हाण वाडी च्या राजा"चे दर्शन घेतले. "चव्हाण वाडीच्या राजाचे" दर्शन घेण्या साठी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



 गणपती बाप्पाच्या उरण येथील " चव्हाण वाडीचा राजा" या साखरचौथ गणपती चे दीड दिवसाचा  काळात वाडीतील तरुण मुलांनी, महिलांनी रात्रभर भजन व ईतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


तसेच ह्या वर्षी श्री. महेंद्र चव्हाण यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन महिलांन साठी ३ पैठणी साड्या विजेत्या महिलांना देऊन महिलांचा  खेळात भर देऊन कायक्रमांची शोभा वाढवली.


चव्हाणवाडीच्या राजाचा  आगमनाने संपूर्ण वाडीत प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वाडीतील सर्व कुटुंब वाडीचा राजा येणार म्हणून दोन दिवस श्री ची सेवा करण्यात मग्न असतात.



ज्याला जसे जमेल तो त्यात्या परीने श्री ची सेवा करत असतो. ह्या वर्षी दर्शनाला येणाऱ्या भाविकांन साठी दोन दिवस म्हणजेच चार वेळेस  महाप्रसाद श्री. बाबल्या शेठ चव्हाण व जितेंद्र चव्हाण यांनी  केला. तसेच श्री चे आगमनापासून ते विसर्जनापर्यंत वाडीतील सभासद राहुल चव्हाण, परेश चव्हाण, योगेश चव्हाण, शैलेश चव्हाण, दिनेश जानवळकर, महेश चव्हाण,  विनोद सावर्डेकर, मनीष चव्हाण, धनु चव्हाण, अमित चव्हाण  व इतर सभासद यांनी मेहनत घेतली.


   चव्हाण वाडीच्या राजाचे उत्साहात व भक्तीमे वातावरणात विसर्जन करण्यात आले.





Post a Comment

0 Comments