Type Here to Get Search Results !

सातगाव डोंगरी येथे अतिवृष्टी बाधित कुटुबांना मदतीचा हात म्हणजेच "माणुसकीची भिंत " उपक्रमातर्गंत किराणा मालाचा शिधावाटप

 सातगाव डोंगरी येथे अतिवृष्टी बाधित कुटुबांना मदतीचा हात म्हणजेच "माणुसकीची भिंत " उपक्रमातर्गंत किराणा मालाचा शिधावाटप




सातगाव (डोंगरी )  ता. पाचोरा येथे दि : १ /१० /२०२५ रोजी बुधवारी सकाळी १० वाजता बाराखोली व गफूर नगर सातगाव (डोंगरी ) येथे रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी -संगम व इनरव्हील क्लब ऑफ मिल्कसिटी चाळीसगाव तर्फे जवळपास १५० कुटूंबांना एक आठवडा पुरेल असा शिधा - तांदूळ , गहूपीठ , साखर , चहा , तूरदाळ , तेल चे किट गरीब पूरग्रस्त लोकांना घरोघरी जावून वाटप करण्यात आले . नियतीने सारे हिसकावून घेतलेल्या कुटुंबाला एक आशेचा किरण जागवला . कुटूंबांना यावेळी रोटरी एन्कलेव्ह चेअरपर्सन रविंद्र शिरूडे , प्रोजेक्ट चेअरमन कुणाल रुईकर , अध्यक्ष रोटे .श्रीकृष्ण अहिरे , माजी प्रेसिडेंट रोटे सुधीर आबा , प्रा भागवत महालपुरे, रोटे .प्रकाश कुळकर्णी , रोटे .आधार महाले , रोटे .सुभाष करवॉ , रोटे बालाप्रसाद राणा व इनरव्हिल पदाधिकारी सौ मनिषा शिरूडे , सौ निगार चव्हाण , सौ स्मीता करमरकर व सौ लक्ष्मी त्रिखत्री यांचे हस्ते पूरग्रस्त क्षेत्रात घरोघरी जाऊन कुटुंब धारकाला शिधाकीट देण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्तविक कोषाध्यक्ष शालिग्राम निकम यांनी केले . यावेळी गावाचे रहिवाशी प्रा भागवत महालपुरे सर व स्थानिक रहिवाशांनी वाटपाचे यथोचित नियोजन केले . एक मदतीचा हात... माणूसकीची भिंत म्हणून ह्या उपक्रमाचे कौतूक ग्रामस्थांनी केले व आभार प्रा भागवत महालपुरे सरांनी मानले .


"



" माणुसकीची भिंत या उपक्रमातून खऱ्या अर्थाने गोरगरीब पूरग्रस्ताची सेवा म्हणजेच शिवभावे जीवसेवा घडली . ही उर्मी मला शांत बसू देत नव्हती . ती कृतीत उतरली म्हणून मला धन्यता वाटते ! याचं सर्व श्रेय रोटेरियन्स यांना द्यावेसे वाटते .

............ रोटे रविंद्र शिरूडे

एन्क्लेव्ह चेअरपर्सन रूरल जळगाव .


  बातम्या आणि जाहिराती साठी - 

Uranshahar@gmail.com  वर mail करू शकता..

mahaindia24


 समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा,..वेळीच केलेली छोटीशी मदत कुटुंबाला सावरणारी व जीवनाला उभारणी देणारी वाटली . कीट वाटप करतांना लोकांच्या नजरेतील दुखाश्रू व आनंदाश्रू यांची भेट झाली होती . सातगावचे रहिवाशी चाळीसगाव च्या रोटरी टीमला धन्यता देतांना  कृतज्ञता भाव जाणवला . त्यांचे डोळे पाणावले मात्र खरे ! 




Post a Comment

0 Comments