Type Here to Get Search Results !

उरण महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

 उरण महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा




उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन उरण महाविद्यालयात साजरा करण्यात आला.





याप्रसंगी डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी आढावा युट्युब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. यामध्ये कु. अमिना शेख व कु. इशा रावल या विद्यार्थिनीनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्म, शिक्षण व त्यांचे करियर, संशोधन व त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी कु. खुशी शर्मा,  कनिशा पाटील व  कु. प्राप्ती पांगुळ या विद्यार्थिनींनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले.





 

वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि  अब्दुल कलाम यांच्या विषयी अनेक पुस्तके आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. सदर पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन करावे व त्याप्रमाणे आपल्या जीवनात एक चांगला आदर्श घ्यावा व आपले कार्य कर्तुत्व सिद्ध करावे. त्यांनी दिलेली विविध भाषणे ही आत्मसात करावी असे आवाहन प्राचार्य गर्जे यांनी केले.अब्दुल कलम यांचे बालपण ते सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळल्याबद्दलचे विवरणही प्राचार्य गर्जे यांनी यावेळी केले . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. आनंद गायकवाड यांनी त्यांचे तात्विक विचारांचे विचारधन विद्यार्थ्यांसमोर ठेवले. डॉ. जगताप एच.के. यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. डॉ. पराग कारुळकर यांनी सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त मनोगत व्यक्त केल्याबद्दल  त्यांना भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी डॉ. एम.जी लोणे, डॉ. ए आर चव्हाण , प्रा.आर. टी. ठवरे, प्रा. विनिता तांडेल, प्रा. हन्नत शेख , प्रा. पूजा गुप्ता  व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी  आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.व्ही एस इंदुलकर यांनी ह्यूमन टू ह्यूमन  बिंइंग (मनुष्य ते मनुष्यपण) चा प्रवास अब्दुल कलामांचे जीवनपट पाहिल्यावर आपण सर्वजण नतमस्तक होतो असे सांगितले. शेवटी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आरती पाटील हिने केले.




Post a Comment

0 Comments