Type Here to Get Search Results !

समाजातील प्रत्येक व्यक्तीला सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजना, सवालती अनुदान आणि धनादेशाचा संपूर्ण लाभ थेट बँक खात्यातून मिळावा यासाठी बँकेत खाती उघडण्यात आली

 

 नवी मुंबई दिनांक ४ नोव्हेंबर

आदिवासी पारधी महासंघाचे मुंबई व नवी मुंबई प्रदेशाध्यक्ष मा. संतोष एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑक्टोबर रोजी समाजहिताचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत घणसोली पारधी पाड्यावर इंडियन ओव्हरसीज बँकेचे (Indian Overseas Bank) अकाउंट मॅनेजर यांना आमंत्रित करून पारधी समाजातील वीस (२०) बांधवांची नवीन बँक खाती उघडण्यात आली. या उपक्रमा मागचा उद्देश असा की पारधी समाजातील बांधवांनी स्वतःचा पैसा सुरक्षित ठेवावा, त्याचा योग्य आणि नियमित वापर करावा, तसेच पैशाच्या गैरवापराला आळा घालावा. याशिवाय, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजना, आणि सवलती, अनुदाने आणि धनादेशांचा संपूर्ण लाभ थेट बँक खात्यातून मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. 



   पारधी समाजासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचे राहणीमान उंचावणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. काही महत्त्वाच्या योजना पुढीलप्रमाणे आहेत ¹ ²:

- पारधी घरकुल योजना: या योजनेअंतर्गत पारधी समाजाला पक्की घरे बांधून देण्यात येतात, ज्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल. या योजनेचे उद्दिष्ट आदिवासी पारधी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना योग्य निवारा देणे आहे.

- आदिवासी विकास कार्यक्रम: या कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडणे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्य देणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

- शबरी आदिवासी घरकुल योजना: या योजनेअंतर्गत शहरी भागातील आदिवासी लाभार्थ्यांना पक्की घरे देण्यात येतात.



या योजनांद्वारे सरकार पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे.       

Post a Comment

0 Comments