अपघात की घातपात
पोलारीस लॉजीस्टिक पार्क भेंडखळ येथे कलमार च्या टायर खाली चिरडून ट्रक ड्राइव्हर चा अपघात.
पोलारीस आणि जे.एन, पी. टी आवारातील इतर cfs यांनी लक्ष देण्याची गरज
उरण दि ९. ऑक्टोबर.
उरण शहर हे कंटेनरच्या गाव म्हणून ओळखले जाणारे शहर त्यातच भेंडखळ गावात सर्वात अधिक कंटेनर गोदाम ह्याच गावात.
कंटेनर गोदाम म्हटलं की सर्वाना दिसतो तो पैसा, दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल प्रत्येक cfs गोदामातून होते, त्यातच दिवसाला
१ कंटेनर हाताळणी साठी कलमार ऑपरेट १००, २०० ते ५०० रुपये चाय पाणी घेत असतो. नाही दिले तर सकाळपासून आलेले ड्राइव्हर ला अगदी रातभर थांबवून ठेवले जाते. पैसे मना प्रमाणे दिले तर ठिक नाहीतर बस रात्रभर अशी काहीशी भाषा ह्या ऑपरेटरांची असते. प्रत्येक ऑपरेट हा दिवसाला २०, ३० हजार रुपये,
yard incharge आणि सेफ्टी मॅनेजर च्या सगंनमताने कमावत असतो.
ड्राइवर ला गाडी खाली करण्यासाठी तसेच गाडी भरण्यासाठी कलमार ऑपरेटरला (चायपाणी म्हणून) पैसे देण्यासाठी कलमारवर (कंटेनर हडळण्या ची मशीन)चढावे लागते. सुरक्षेचा दृष्टीने कलमारपासून ३० ते ६० फूट अंतर लांब सर्वांनी उभे राहायचे असतें. पण पैसे दिल्या शिवाय गाडी भरत नाहीत आणि गाडी वर असलेला कंटेनर खाली पण उतरवत नाहीत.
पोलारीस कंपनी मध्ये अनेक चोऱ्या होत असतात, इम्पोटर, एक्स्पोटर हें त्यांचा
परदेशातून येणारा माल सुरक्षित ठेवण्यासाठी या गोडाऊनमध्ये ठेवला जातो पण सुरक्षा अधिकारी, सेक्युरिटी आणि cfs स्टाफ यांच्या
मदतीने स्थानिक गुंड पुर्ण कंटेनर गायब करतात. अशी चर्चा पोलारीस कंपनी मध्ये काम करणारे कामगार बोलत होते.
बातम्या आणि जाहिराती साठी
uranshahr@gmail.com
Mail id वर संपर्क करा
पोलारीस कंपनी मध्ये माल वाहतूक करणारे ड्राइवर हे अक्षरशः वैतागले असतात, पार्किंग ची वेवस्था नाही, मेन रस्त्यावर गाडी पार्किंग करावी लागते त्यात पोलिसांचा त्रास आहेच, पण गाव गुंड १००, २०० रुपये पार्किंग च्या नावाने टोल घेताना दिसतात.(अर्थात उरण पोलिसांचा आशीर्वाद ह्या गाव गुंडाना आहेच) नाही दिले तर मारण्या च्या धमकी आणि क्रितेक वेळा गाडी चालकाला मार पण खावा लागतो.
उरण मधल्या मोठया राजकीय पक्षाचा मोठ्या नेताचे हे cfs आहे, म्हणून कि काय हम कुछ भी करे हमारा राज चलेगा असा इथला सेक्युरिटी ते स्टाफ वावरत असतो.
ज्या ट्रक ड्राइवर चा जीव गमावला त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं गरजेचे आहे आणि ती मिळालीच पाहिजे.
Hr. मॅनेजर शी संवाद साधला असता ते म्हणाले शनिवार पर्यंत त्यांना योग्य ती मदत आम्ही करू..पोलाईस चे HR हेड स्वतः सरकारी दवाखान्यात घटना घडल्या पासुन होते.. जीव गमावलेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला योग्य ती मदत कंपनीकडून करू असे आश्वासन एच आर च्या हेड नी आपल्या पत्रकारांना दिले आहे. तसेच पुढे असा अपघात होणार नाही याची पण काळजी घेण्याची विनंती महाइंडिया चे संपादक सचिन काजरोळकर यांनी केली. कंपनी तसेच कलमार ऑपरेटर वर काय गुन्हे दाखल होत आहेत या कडे उरण करांचे व तरुण मुलाचा जीव गेलेल्या कुटुंबाचे लक्ष लागून आहे, पुढील तपास उरण पोलिस करत आहेत.


Post a Comment
0 Comments