✈️✈️
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनामुळे अवजड वाहनांना बंदी. ✈️✈️
नवी मुंबई दि. ०७ अक्टोबर,वार्ताहर पुजा चव्हाण.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाचे व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. हे वाहतुक बदल ८ ऑक्टोबरला सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लागू असतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. पनवेल जवळील उलवे भागात हे विमानतळ असल्याने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरमधील रहिवाशांना हे विमानतळ गाठण्यासाठी काही महत्त्वाचे रस्ते मार्ग उपलब्ध आहेत. वाहतुक कोंडी तसेच विविध कारणांमुळे सध्याचा प्रवास त्रासदायक ठरु शकतो.
बातम्या आणि जाहिराती साठी
Uranshahar@gmail.Com
संपर्क साधा
✈️✈️
विमानतळच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, मुंबई, उपनगर, पुणे, रायगड, पालघर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या विमानतळ गाठण्यासाठी विविध मार्गिका उपलब्ध असल्या तरी रस्त्यांची दुरावस्था, वाहतुक कोंडी यामुळे काहीसा फटका वाहन चालकांना बसण्याची शक्यता आहे.
जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, प्रवासी वाहने इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे बदल लागू नसतील.
काय आहे वाहतुक बदल 👇
नवी मुंबई येथून हजारो अवजड वाहने दररोज वाहतुक करत असतात. ८ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अतिमहत्त्वाचे व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत पोलिसांचा मोठ्याप्रमाणात बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. बंदोबस्त, सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या नियोजनामुळे नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या, प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी च्या समस्या प्रलंबित असुन, प्रकल्पग्रस्तांना अजून नोकऱ्या नाहीयेत.
विमानतळला दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्या वरून वाद असताना, उद्घाटनाची घाई कशासाठी. असे अनेक प्रश्न स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पडलेले आहेत.


Post a Comment
0 Comments