Type Here to Get Search Results !

उरण-चिरनेर येथून 30 वर्षाची विवाहिता बेपत्ता

 उरण-चिरनेर येथून 30 वर्षाची विवाहिता बेपत्ता

(उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून)

                उरण येथील चिरनेर गावामधून 30 वर्षाची विवाहिताघरात कुणासही काही न सांगता अचानकपणे बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली असून जनमानसांत हा चर्चेचा विषय बनला आहे.या संदर्भात उरण पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत,




              या बाबत पोलीस अधिकृत  सुत्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उरण-चिरनेर येथील सुधीरशेठ याच्या चाळीत(बांधानपाडा)ता.उरण, ही विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्यास होती परंतु ती अकस्मात बेपत्ता झाली आहे.या घटनेची खबर तिचे पती “हिंदकुमार राजेश कुशवाह” यांनी उरण पोलीस ठाण्यात केली असून केस नं.-79/2025 स्टेशन डायरी नं  023/2025 प्रमाणे या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


बातम्या आणि जाहिराती साठी 

uranshahar@gmail.com

 ला संपर्क करा..


 

  बेपत्ता असणाऱ्या महिलेचे पूर्ण नाव “सवनाबाई हिंदकुमार कुशवाह”वयवर्ष 30 असून तिची उंची 145 सेंटी मीटर, रंग गोरा,मजबूत बांधा,नाक सरळ,केस विरळ,डोळे काळे, गोल चेहरा,   उजव्या हातावर सवाना असे नाव गोंदवीले आहे. तालुका उरण-गाव चिरनेर येथील सुधीरशेठ याच्या चाळीत तिचे  सध्याचे वास्तव्य असून मूळराहणार राज्य मध्यप्रदेश येथील-जिल्हा सतना गाव कुशली पोस्ट ऑफिस इचौल येथील मूळ रहिवासी आहे.चिरनेर येथील घरांतून जातेवेळी अंगात लाल रंगाचा ती शर्ट व निळ्या रंगाची जीन पँट परिधान केलेली आहे.सदर तरुणी चा शोध उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ  मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस घेत आहेत.

कोणाला सवनाबाई कुशवाह हिच्या बाबत काही माहिती असल्यास, उरण पोलिस ठाण्यात कळवण्या चे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलांनी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments