उरण – भेंडखळ येथे कंटेनर धडकेने युवकाचा जागीच मृत्यू.
उरण – भेंडखळ येथे कंटेनर धडकेने युवकाचा जागीच मृत्यू, नागरिकांचा ‘रास्ता रोको’ आंदोलन.
पूजा चव्हाण
उरण, 8डिसेंबर २०२५_ उरण तालुक्यातील नवघर‑खोपटा रस्त्यावर सोमवारी दुपारी १:३० वाजता भीषण अपघात झाला.
भेंडखळ गावातील ३८‑वर्षीय अमोल काळूराम ठाकूर आपल्या मोटारसायकलवरून खोपटा गावाकडे जात असताना, बाँमण लाँडी यार्डजवळ तेज गति असलेल्या कंटेनर ट्रेलर (एमएच 42 बीयू 5072) ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनरने अमोलला काही मीटर फरफटत नेले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, कंटेनर ट्रेलरला ताब्यात घेतले आणि रस्त्यावर ठिय्या मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर, तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id-
uranshahar@gmail.com
अमोल ठाकूर भेंडखळ गावाचा रहिवासी असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.
तर उरण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करून पोलीस यावर काय कारवाही करतील यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



.jpg)

Post a Comment
0 Comments