Type Here to Get Search Results !

उरण मोरा येथील डिझेल टास्करी करणाऱ्या वर चाप बसणार का? नागरिकांचा प्रश्न.

 🔶उरण मोरा येथील डिझेल टास्करी करणाऱ्या वर चाप बसणार का? नागरिकांचा प्रश्न.🔶






 प्रतिनिधी पूजा चव्हाण.

उरण तालुक्यातील मोरा परिसरात डिझेल तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वृत्त आहे. सागरी पोलीस ठाणे आणि तटरक्षक दलाच्या निष्क्रियतेमुळे ही तस्करी खुलेआम सुरू आहे. परदेशी जहाजातून डिझेल कमी भावात खरेदी करून ते काळ्या बाजारात जादा दराने विकले जात आहे, ज्यामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात हे डिझेल तस्कर बुडत असल्याचे दिसत आहे तरी देखील हे डिझेल टास्करी करणारे तटरक्षक यांच्याशी हात मिळवणी करून आपला धंदा मात्र रासरोस पणे करतांना दिसत आहेत.




डिझेल तस्करी मुळे सरकारचा महसूल बुडतोय,काळ्या बाजारात डिझेलची किंमत वाढते.

- शासकीय यंत्रणेची निष्क्रियता अधोरेखित होते.सागरी पोलीस ठाणे आणि तटरक्षक दलाने गस्त वाढवणे गरजेचे आहे.तस्करी करणाऱ्या माफियावर कडक कारवाई करणे डिझेलची काळ्या बाजारात विक्री रोखणे असून या मधील कोणतीच तस्करी रोखण्यासाठी कारवाई केली जात असल्याचे दिसत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

तसेच  उरण तालुक्यातील मोरा परिसरात डिझेल तस्करीचा मुद्दा स्थानिक निवडणुकांमध्ये चर्चेत घेतला होता त्यामध्येही शासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे तस्करी रोखण्यात व वारंवार तक्रारी करूनही तहसिलदार आणि महसुल प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id -> uranshahar@gmail.com





Post a Comment

0 Comments