शिव सेना उलवे शहर प्रमुख पदी वहाळ गावचे सुपुत्र प्रथमशेठ पाटील.
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा शिव सेना जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी उलवे शिवसेना प्रमुख पदी वहाळ गावचे सुपुत्र प्रथमशेठ पाटील यांच्या निवडीची घोषणा केली. उरण येथील कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अतुल भगत यांनी ही निवड जाहीर केली. या वेळी उरण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली ठाकुर, पनवेल तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील, उरण तालुका अध्यक्ष दीपक ठाकूर, उलवे शिवसेना उप शहर अध्यक्ष सुधीर घरत, संपर्क प्रमुख कुलदीप तिवारी, मोहा गाव शाखा प्रमुख धनंजय कोळी, उलवे सेक्टर २० शाखाप्रमुख सुरी पुरुषोत्तम गौर, उप शाखा प्रमुख रवी राममूर्ती यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी uranshahar@gmail.com ला संपर्क करा.
मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या उलवे येथील कार्यालयात आज प्रथमशेठ पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले या वेळी त्यांना सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. या वेळी नंदकुमार भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.शिव सेना उलवे शहर प्रमुख पदी वहाळ गावचे सुपुत्र प्रथमशेठ पाटील यांची नियुक्ती झाल्याने या नियुक्तीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments